Leader of Opposition Vijay Wadettiwar
ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामस्तरावर विविध समस्या भेडसावत असतात. त्यामध्ये प्रशासनाबाबत काही तक्रारी असतात सोबतच विकासकामां संदर्भात देखील अनेक प्रश्न असतात. त्यामुळे नागरिक आपल्या समस्या घेऊन माझ्यापर्यंत येतील याची वाट न बघता महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील विविध गावांत भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत तात्काळ मार्गी लावल्या. यामध्ये झिलबोडी(परसोडी), धामणगाव, तुलन्हानमेंढा, गायडोंगरी, परसोडी(तु.) या गावांचा समावेश आहे.
सोबतच ब्रम्हपूरी मतदारसंघात गावांगावात सुरू असलेली विकासकामे, जनसेवा याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. जनतेच्या सेवेसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्वखर्चातून सुरू केलेल्या “विजयदुत” या उपक्रमाबाबत माहिती देऊन शासकीय कामासंदर्भात येणाऱ्या अडचणींसाठी विजयदुत यांच्या कडून कामे करून घ्यावीत असेही त्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी दिलेली निवेदने तातडीने मार्गी लावून पुढील विकासकामांचे नियोजन करण्यात आले.
Leader of Opposition Vijay Wadettiwar यावेळी प्रामुख्याने विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे, न.प.माजी बांधकाम सभापती विलास विखार, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोंटु पिलारे, बाजार समितीचे संचालक किशोर राऊत, अॅड आशिष गोंडाणे, अतुल राऊत, रवी पवार, जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, सरपंच निता शेंडे, सरपंच सचिन लिंगायत, मंगेश शेंडे, कैलाश खरकाटे, रवी शेंडे, अमर गाडगे, प्रमोद भर्रे, धनराज मिसार, संदीप राऊत, सुशील शेंडे, भगवान ठाकरे, ईश्वर कुथे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.