Maharashtra Prevention Of Defacement Of Property Act शहरात विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या नवशक्ती आयुर्वेदीक दवाखानाविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. १ कार्यालयाद्वारे शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शहरातील जटपुरा गेट तसेच छोटा बाजार चौक रोड परिसरातील भिंतींवर,विविध शासकीय व खाजगी परिसरात नवशक्ती आयुर्वेदीक दवाखान्याची जाहिरात करणारे स्टीकर्स,भिंतीपत्रके मनपाकडुन पूर्वपरवानगी न घेता लावले असल्याचे सहायक आयुक्त यांना २६ जुन रोजी पाहणीदरम्यान आढळुन आले.
Maharashtra Prevention Of Defacement Of Property Act संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले असता अद्याप पावेतो भिंतीपत्रके न काढल्याने नवशक्ती आयुर्वेदीक दवाखाना यांच्यावर महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत कलम ३ नुसार फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा अश्या आशयाची तक्रार करण्यात आली आहे. जाहिरात करण्यास अश्या प्रकारचा अवलंब केल्याने शासकीय निधीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तसेच शहर सुशोभीकरणाच्या कामातही बाधा निर्माण होते.
Chandrapur news : उडता चंद्रपूरची वाटचाल थांबवा – कांग्रेस नेते महेश मेंढे
भिंतीपत्रके,पोस्टर्स,बॅनरबाजी