Mla Pratibha Dhanorkar 4 जून लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस या दिवसाची उत्सुकता विविध पक्षातील कार्यकर्त्यांना लागलेली आहे, निकालापर्वी विविध पक्षातील लोकसभा उमेदवार विजय आपलाच यावर दावा करू लागले आहे.
अवश्य वाचा : चंद्रपूर शहराची या कार्यासाठी झाली निवड
विदर्भातील चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत राज्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात होत्या, निकालापूर्वी लोकसभा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या विजयाचा दावा केलायं.
Mla Pratibha Dhanorkar 4 जून चा निकाल हा देशाच्या दृश्टीने अत्यंत महत्वाचा असून देशाला कलाटणी देणारे ठरणार आहे. मी माझ्या विजयाबद्दल आश्वस्त असून जनतेनी सेवा करण्याची संधी दिल्यास संधी चे सोणे करुन चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी मी सदैव कटीबध्द राहील.