MP Pratibha Dhanorkar : ज्यांनी मला मतदान केलं नाही त्यांनी…खासदार प्रतिभा धानोरकर

Mp pratibha dhanorkar राष्ट्रीय ओबीसी महासंघ, विमुक्त भटक्या जाती, जमाती व अनुसूचित जाती समाजाच्या वतीने 22 जून ला चंद्रपूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात करण्यात आले होते.

अवश्य वाचा : आता विधानसभा निवडणुकीची तयारी, चंद्रपूर जिल्हा प्रशासन लागले कामाला

आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, आमदार सुधाकर अडबाले, जयदीप रोडे यांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ व सर्व जाती जमतीतर्फे खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला.

Congress news maharashtra : महायुती सरकारवर कांग्रेसने चंद्रपुरात फेकले चिखल

Mp pratibha dhanorkar यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की लोकसभा निवडणुकीत ओबीसी, एससी, एसटी सहित सर्व समाजाने मला भरभरून मदत केली, आज मी आपल्यासमोर एक गोष्ट सांगू इच्छिते की मी 18 लाख मतदारांची प्रतिनिधी आहे, ज्यांनी मला मतदान केलं व ज्यांनी मतदान केलं नाही त्यांनी आपल्या मनात कसलीही शंका न बाळगता माझ्याकडे काहीही काम असल्यास आवर्जून व हक्काने यावे.

 

Mp pratibha dhanorkar आपल्या मनात असा विचार आणू नका की आपण मला मतदान केलं नाही तर मी आपलं काम करणार नाही, मी आपल्या सर्वांची प्रतिनिधी आहे, प्रत्येक नागरिकांचे काम करण्याचा अधिकार आपण मला दिला आहे. असे प्रतिपादन सत्कारमूर्ती खासदार धानोरकर यांनी यावेळी केले.

आयोजित कार्यक्रमात असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!