MP Pratibha Dhanorkar : चंद्रपूर लोकसभा क्षेत्राला 60 वर्षांनी मिळाल्या महिला खासदार

MP Pratibha Dhanorkar चंद्रपूर : 19 एप्रिलला पार पडलेल्या 13 चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज 4 जून रोजी चंद्रपूरात पार पडली. 28 व्या फेरी अखेर काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी सुमोर 2 लाख 60 हजार 406 मताधिक्याने आघाडी घेऊन दणदणीत विजय मिळविला आहे. मोठ्या मताधिक्याने राज्याचे वनमंत्री तथा कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे्. अडीच लाखाच्या फरकाने आघाडी घेतल्याने धानोरकर यांनी विजयी जल्लोष साजरा केला. प्रतिभा धानोरकर ह्या चंद्रपूर लोकसभेच्या दुसऱ्या महिला खासदार ठरल्या. 1964 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत इंदिरा काँग्रेसच्या गोपिकाबाई कन्नमवार ह्या पहिल्या महिला खासदार म्हणून जिंकून आल्या होत्या. 60 वर्षांनी प्रतिभा धानोरकर यांनी हा बहुमान मिळविला.

अवश्य वाचा : दहावी पास विद्यार्थी होणार इंजिनिअर

13 चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक 19 एप्रिलला पहिल्या टप्यात पार पडली. त्यामध्ये भाजपाचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचेसह 15 उमेदवार रिंगणात उभे होते. सर्वच उमेदवारांचे भाग्य इव्हिएम मध्ये बंद झाल्यानंतर आज 4 जून ला मशिनबंद झालेले भाग्य उघडण्यात आले. या क्षेत्रात खरी लढत भाजपाचे हेविवेट नेते तथा विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार विरूध्द कॉग्रेसच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या मध्ये होती.

 

MP Pratibha Dhanorkar मुनगंटीवार यांनी मतमोजणीच्या पूर्वसंध्येला माध्यमांशी बोलताना लाखाच्या फरकाने विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु आज हाती आलेले निकाल मुनगंटीवार यांच्यासाठी धक्कादायक ठरले. सकाळी 8 वाजतापासून सुरू झालेल्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून तर 28 व्या फेरीपर्यंत कॉग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनीच आघाडी घेतली. पहिल्या एक दोन फेरीनंतर मुनगंटीवार हे आघाडी घेतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. परंतु ती अपेक्षा भंग ठरली. एक दोन नव्हे तर तब्ब्ल 28 व्या फेरी अखेर प्रतिभा धानोरकर यांनी 7 लाख 18 हजार 410 मते मिळविली. तर प्रतिस्पर्धी भाजपाचे सुधीर मुनगंटीवार 4 लाख 58 हजार 004 मते घेतली. तब्बल 2 लाख 60 हजार 406 मतांनी मुनगंटीवारांना मागे टाकले. विशेष म्हणजे प्रतिभा धानोरकर यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी 28 व्या फेरीपर्यंत कायम ठेवली.

अवश्य वाचा : स्मार्ट मीटर योजना काय आहे? जाणून घ्या

MP Pratibha Dhanorkar प्रारंभापासून लोकसभची निवडणूक लढविण्याची इच्छा नव्हती, परंतु पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली पण त्यांना यामध्ये यश आले नाही. आजच्या लोकसभेच्या निवडणूकीत त्यांना मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले आहे. वंचितचे राजेश बेले यांना 21 हजार 980 मध्य 28 व्या फेरी अखेर मिळाले. विशेष म्हणजे यावेळीही नोटाचा संख्या वाढली आहे. 2019 मध्ये सुमारे 6 हजार नोटाला पसंती दिली होती. यावेळी त्यामध्ये वाढ होवून 10 हजार 843 वर पोहचला आहे.

 

सन 2019 मध्ये मोदी लाटेमध्ये काँग्रेसचे बाळू धानोरकर हे महाराष्ट्रात या जागेवर 45 हजाराने एकमेव उमेदवार निवडून आले होते. परंतु काही महिण्यापूर्वीच त्यांचे आजाराने निधन झाले होते. त्यानंतर त्याच जागेवर त्यांच्याचं पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी निवडणूक लढविली. आणि मोठ्या मत्ताधिक्याने विजय मिळविला . विशेष म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचे प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरात आले. राज्याचे मोठमोठे नेत्यांनी मुनगंटीवार यांचेसाठी प्रचार केला. परंतु यावेळी मोदीची जादू चालली नाही. भाजपाला मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले.

सुधीर मुनगंटीवार यांची पराभवाची हट्रिक

सुधीर मुनगंटीवार यांनी पहिली निवडणूक वर्ष 1989 मध्ये लढविली होती, त्या निवडणुकीत मुनगंटीवार यांना 1 लाख 93 हजार 397 मते मिळाली होती.

दुसरी निवडणूक वर्ष 1991 मध्ये लढविली, त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी 1 लाख 23 हजार 122 मते मिळविली मात्र दोन्ही निवडणुकीत मुनगंटीवार यांना कांग्रेसचे नेते शांताराम पोटदुखे यांच्या पुढे पराभव स्वीकारावा लागला.

 

MP Pratibha Dhanorkar 34 वर्षांनी पुन्हा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची संधी मुनगंटीवार यांना मिळाली, आधी मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली, मात्र पक्षाने जबाबदारी दिल्यावर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. 6 विधानसभा क्षेत्रात त्यांनी सभा घेतल्या, इतकेच नव्हे तर खुद्द प्रधानमंत्री मोदी यांनी चंद्रपुरात सभा घेतली, त्यानंतर भाजपचे अनेक दिग्गजांनी मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सभा घेतली मात्र निवडणुकीत त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

 

वर्ष 2019 च्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा 44 हजार मतांनी पराभव झाला होता, मात्र यंदा मुनगंटीवार रिंगणात उभे असल्याने लढत अटीतटीची होणार असा विश्वास कार्यकर्त्यांना होता, मात्र त्या लढतीत मुनगंटीवार यांचा विजय होणार, पण तसे काही झाले नाही.

 

MP Pratibha Dhanorkar वर्ष 2019 ते 2024 च्या निवडणुकीत धानोरकर यांनी 6 पट जास्त मताधिक्य घेतलं आणि विजय प्राप्त केला, विशेष बाब म्हणजे एकही कांग्रेसचा बडा नेता धानोरकर यांच्या प्रचाराला आला नाही त्यानंतर सुद्धा त्यांचा विजय झाला, यंदा जनतेनी ही निवडणूक हातात घेतली होती.

 

मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

मी माझा पराभव नम्रपणे स्वीकारतो, व विजयाबद्दल प्रतिभा धानोरकर यांना शुभेच्छा देतो, जनतेनी विकासाला नाकारलं, आता लोकसभा क्षेत्राच्या विकासाची जबाबदारी धानोरकर यांनी चांगली पार पाडावी अश्या शुभेच्छा त्यांना देतो.

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!