Mukhyamantri Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांना वर्षाला मिळणार 12 हजार रुपये

Mukhyamantri ladki bahin yojana लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सावध झालेल्या राज्यातील महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुकीत 45 प्लस चा नारा देणाऱ्या महायुतीला निकालात जोरदार फटका बसला, विशेष म्हणजे निकालात भाजप, सेना व राष्ट्रवादी कांग्रेसला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

अवश्य वाचा : पेपरफुटी कायदा म्हणजे काय?

Mukhyamantri ladki bahin yojana काही महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहे, त्यासाठी महायुती सरकारने तयारी सुरू केली आहे.

महत्त्वाचे : धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये

त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात गरीब महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबवण्याच्या हालचाली सुरू आहेत. याअंतर्गत गरीब महिलांना दरमहा १२०० ते १५०० रुपये दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर वार्षिक १५ ते २० हजार कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

 

योजना काय?

  • महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतानाच गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी योजना.

 

  • पहिल्या टप्प्यात दारिद्र्यरेषेखालील ९० ते ९५ लाख महिलांना महिन्याला १२०० ते १५०० रुपये.

 

  • दारिद्रयरेषेखालील २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिला, तसेच विधवा, परितक्त्या, घटस्फोटितांना लाभ. रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा.

 

Mukhyamantri ladki bahin yojana आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. त्यासाठी समाजातील विविध घटकांसाठी नव्या आकर्षक योजना आणण्याची तयारी सुरू आहे. विशेषतः महिला आणि तरुणांच्या मतपेढीवर डोळा ठेवून त्यांना खूश करण्यासाठी दोन मोठ्या योजनांची आखणी सुरू आहे. राज्यातील महिलांची मने आणि मते जिंकण्यासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबविण्याचे नियोजन आहे. या योजनेबाबत माहिती घेण्यासाठी सरकारने अधिकाऱ्यांचे एक पथक अलीकडेच मध्य प्रदेशला पाठविले होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!