Ncp Sharad Pawar वर्ष २०२४ ला महाराष्ट्रात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातून “बल्लारपूर विधानसभेसह”, चंद्रपूर किंवा चिमूर पैकी एक अश्या दोन जागा महाआघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या(शरदचंद्र पवार) वाट्यात घ्याव्या अशी एकमुखी मागणी,जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते,तालुका अध्यक्ष,विधानसभा अध्यक्ष,यांनी पक्ष निरीक्षक श्री.दिलीप पनकुले यांच्या समक्ष मांडली.
अवश्य वाचा : उडता चंद्रपूर होऊ देऊ नका – महेश मेंढे
बैठकीत जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी बल्लारपूर सह चंद्रपूर किंवा चिमूर अश्या दोन जागा २०२४ च्या निवडणुकीत पक्षाला मिळण्यासंदर्भात विदर्भाचे पक्षाचे नेते आ.अनिलबाबु देशमुख आणि प्रदेश अध्यक्ष आ.जयंतराव पाटील,आणि पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्याकडे केलेली आहे.
Ncp Sharad Pawar पक्षनिरीक्षक पनकुले यांनी सुद्धा यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींकडे कळवाव्या,आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक आ.अनिल देशमुख, यांच्यासोबत आणि मुंबईला प्रांताध्यक्ष आ.जयंतराव पाटील,आणि देशाचे नेते,पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत लावण्याची विनंती केली. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल, युवक जिल्हाध्यक्ष सुमित समर्थ, महीला जिल्हाध्यक्ष सौ.बेबीताई उईके,ज्येष्ठ नेते प्रदेश, पक्षाचे सरचिटणीस हिराचंद बोरकुटे,चंद्रपूर शहर कार्याध्यक्ष सुधाकर कातकर,राजुरा विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे,राजुरा तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद,जिल्हा उपाध्यक्ष योगराज कुथे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र वरघने,जिल्हा सचिव ऋषी हेपट, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप ढाले, प्रदेश सरचिटणीस शरद जीवतोडे,जिवती तालुका अध्यक्ष कैलाश राठोड, इत्यादी पदाधिकाऱ्यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेत बल्लारपूर विधानसभेची जागा मागील ३५-४० वर्षांपासून काँग्रेस पक्ष लढत आहे आणि पराभूत होत आहे, त्यामुळे “बल्लारपूरची” जागा यंदा राष्ट्रवादीच्या कोट्यात घेण्यासंदर्भात भूमिका घेत,चंद्रपूर जिल्ह्यात २०२४ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार लढलेच पाहिजे अश्या भावना पक्ष निरिक्षकांसमोर व्यक्त करतांना,जर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाच्या वाट्याला जागा सुटल्या नाही,तर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होवून त्याचा परिणाम जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आपापल्या पदांचे सामूहिक राजीनामे देण्याची भूमिका घेतील अशी ठोस भूमिका मांडली.आणि त्याचा परिणाम जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीवर सुद्धा होईल.
अवश्य वाचा : लाडक्या बहिणीला मिळणार वर्षाला 12 हजार
Ncp Sharad Pawar याप्रसंगी पक्ष निरीक्षक दिलीप पनकुले यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या तीव्र भावना पक्ष श्रेष्ठींपर्यंत पोहोचवून विधानसभा उमेदवारीच्या संदर्भात चंद्रपूर जिल्ह्यावर सतत झालेला अन्याय, हा येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दूर करण्यासंदर्भात पक्ष श्रेष्ठींना भूमिका घेण्यास भाग पाडू,आणि लवकरच विदर्भाचे पक्ष प्रमुख आमदार अनिल देशमुख यांच्यासोबत तसेच मुंबईला जयंतराव पाटील,आणि मा.श्री.शरद पवार साहेबांसोबत जिल्ह्यातील पक्षाच्या शिष्टमंडळाची बैठक लावण्याचे आश्वासन दिले.
Ncp Sharad Pawar बैठकीला जिल्ह्यातील पॅरेंटचे,महीला,युवक,चे सर्व तालुका/शहर/विधानसभा अध्यक्ष,जिल्ह्यातील विविध राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व संघटनांचे जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री.मुनाज शेख,प्रदेश चिटणीस श्री.डी.के.आरिकर,सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.महादेवराव पिदुरकर,श्री.जयंत टेमुर्डे,सेवादल जिल्हाध्यक्ष माणिकराव लोणकर,व्यापार व उद्योग विभागाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत अग्रवाल,VJNT सेलचे जिल्हाध्यक्ष रवी नेचपेलवार, ज्येष्ठ नागरिक विभागाचे जिल्हाध्यक्ष सुहास बहादे,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपक बुजाडे,वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष पंकज जगताप,श्री.सुनील मैंद,माजी नगरसेवक राजेंद्र आखरे, सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष नितीन पिंपळशेंडे, ग्राहक सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.देव कन्नाके,आसिफ सय्यद,कैलाश राठोड,बादल उराडे,राजू काब्रा,दिलीप पिट्टलवार,प्रा. किसनराव वासाडे,अविनाश ढेंगळे,बंडू भोंगाडे,नगाजी निंबाळकर,सौ.पूजा शेरकी,सौ.वंदना आवळे,सौ.सरस्वती गावंडे,सौ. मलेश्र्वरी,सौ.निता गेडाम,सौ माया सातपुते, सौ.घरडेताई,चंद्रपूर शहर युवक अध्यक्ष श्री.कलाकार मल्लारप,महीला शहर अध्यक्ष शिल्पताई कांबळे, अल्पसंख्यांक विभागाचे शहर अध्यक्ष बब्बुभाई ईसा,राहुल देवतळे,हिराजी पावडे,बबलू शेख, वसंत कुळमेथे, डॉ.रमेश वऱ्हाटे,वासुदेव सौंदरकर, रफिक निजामी,प्रवीण कोल्हे,शेरीकुमार,कुणाल गायकवाड, डॉ.आनंद अडबाले,अशोक मारगोनवार,शरद मानकर, विक्रांत मोहूर्ले,भगवान पगाडे,सुधाकर रोहनकर, जगन्नाथ सुत्रपवार,मारोती झाडे,दशरथ मिठ्ठावार, अरुण सहारे, यासह जिल्ह्यातील आणि चंद्रपूर शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे संचालन युवक कार्याध्यक्ष श्री.संजय ठाकूर यांनी आणि आभार प्रदर्शन सुधाकर कातकर यांनी केले.