Neet exam 2024 देशात नीट परिक्षे दरम्यान झालेला घोटाळा उघड झाल्यावर विद्यार्थ्यांनी जागोजागी निदर्शने केली, लाखो रुपये खर्च करीत नीट चा पेपर फुटला, निकाल लागल्यावर 67 विद्यार्थ्यांना पैकी च्या पैकी गुण मिळाले शिक्षणाचा हा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचे मत चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशनने लावत चंद्रपूर शहरात भव्य मोर्चा 18 जून रोजी काढला.
शहरातील गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्च्यात हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते, नीट परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी व्हावी, आरोपीना कठोर शिक्षा व्हावी अश्या घोषणा विद्यार्थी मोर्च्यादरम्यान देत होते.
Neet exam 2024 जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा मोर्चा पोहचल्यावर चंद्रपूर कोचिंग क्लासेस चे विजय बदखल व नाहीद हुसेन यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की देशात विद्यार्थ्यांचा शिक्षण क्षेत्रावरून विश्वास उडायला लागला आहे, कारण परीक्षेत असे घोळ होऊ लागले तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान यामुळे झाले आहे.या सर्व प्रकरणाची सीबीआय व ईडी द्वारे चौकशी व्हायला हवी अशी मागणी यावेळी केली.
महत्त्वाचे : मुलीच्या लग्नासाठी महाराष्ट्र सरकार देणार 25 हजार रुपये
मोर्च्यात सहभागी विद्यार्थ्यांनी यावर प्रतिक्रिया दिली की जर पैसे देऊन परीक्षा पास करायची तर अभ्यास करण्याची गरज काय आहे? असे प्रकार देशात होऊ लागले तर अश्या परीक्षेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचे यामुळे मोठे नुकसान होईल, त्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई व्हायला हवी.
चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
आयोजित मोर्च्यात हजारो विद्यार्थी सामील झाले होते.