NEET exam paper leak 2024 : नीट परीक्षा घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा – NSUI ची मागणी

NEET exam paper leak 2024 NEET परीक्षेत मोठ्या प्रमाणात झालेल्या हेराफेरीच्या विरोधात युवा नेते रोशन दादा बिट्टू यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसयूआय जिलाध्यक्ष शफ़क शेख़ यांच्या नेत्तृत्वात सदर परीक्षा रद्द करून परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी 10 जून रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदनामार्फत करण्यात आली.

अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार यांनी युवकाला केली बेदम मारहाण

यावेळी शफक शेख म्हणाले की NEET चा निकाल आला आहे, देशात काही विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, त्यांनी NTA एजन्सीवर बंदी घालण्याबद्दल बोलत आहे आणि NEET परीक्षेच्या या घोटाळ्यामागे मोदी सरकारचाही हात असल्याचे सांगितले. सीबीआय तपासाबाबत बोलताना चंद्रपूर जिल्हा एनएसयूआयने Neet परीक्षा पुन्हा घेण्यात यावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. दोषींना शिक्षा न झाल्यास पुढे मोठे जनआंदोलन करण्याचे संकेत चंद्रपूर एनएसयूआयने दिले आहेत.

 

घोळ काय?

67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले, हरियाणा मधील परीक्षा केंद्रावर 8 विद्यार्थ्यांना 718 गुण, तर 6 विद्यार्थ्यांना 720 गुण प्राप्त झाले, 10 दिवसा आधी निकाल जाहीर करण्यात आला.

अवश्य वाचा : 32 लाखांची टाटा ची xuv घेतली ग्राहक म्हणतो माझी फसवणूक झाली, चंद्रपुरातील प्रकार

NEET exam paper leak 2024 यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य प्रवीण भाऊ पडवेकर, एनएसयूआयचे जिल्हा उपाध्यक्ष दानिश शेख, मनीष दास, साहिल दहिवले, विनीत डोंगरे, अभिनय बागडे, सारिका वाकुडकर, आशिष बावणे, स्मिथ फुलझाले, प्रथम आसवले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!