OBC convention chandrapur मुल – मागील वर्षी चंद्रपूर येथे झालेल्या तीन दिवसीय बहुजन समता पर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो ओबीसी बांधव एकत्र आले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांवर दबाव निर्माण झाला असून याचा फायदा भविष्यात पुढच्या पिढीला नक्की होईल. याच उदात्त हेतूने भारतीय ओबीसी महाधिवेशन ऑगस्ट २०२४ मध्ये चंद्रपूर येथे होणार असून त्याची प्राथमिक तालुका स्तरीय पूर्वतयारी बैठक दिनांक ९जून २०२४ रोज रविवारला सायंकाळी ५ वाजता पत्रकार भवन मुल येथे आयोजित करण्यात आली.
अवश्य वाचा : चंद्रपुरात स्मार्ट वीज मीटर ला विरोध
OBC convention chandrapur सभेच्या अध्यक्षस्थानी माजी जी.प. सदस्य प्रा. रामभाऊ महाडोरे, मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध सर्जन व अध्यक्ष बहुजन समता पर्व व ओबीसी आंदोलन जिल्हा समन्वयक डॉ. संजय घाटे, डॉ. दिलीप कांबळे मुख्य संयोजक बहुजन समता पर्व जिल्हा चंद्रपूर, ओबीसी नेते श्री.नळे साहेब,बहुजन चळवळीचे नकले, माजी प्राचार्य नत्थु पाटील आरेकर, बाजार समिती संचालक किशोर घडसे, माजी सभापती वैशाली पुल्लावार, राजू पाटील मारकवार, गजानन नागापुरे,आदी मान्यवर उपस्थित होते.
अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात युवकाला अमानुषपणे मारहाण
याप्रसंगी जिल्हा समन्वयक डॉ.संजय घाटे यांनी अधिवेश आयोजना मागची भूमिका सविस्तर पने विशद केली. तर मुख्य संयोजक डॉ.दिलीप कांबळे यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना बाबत राजकीय पक्षांवर दबाव निर्माण करणे, ओबीचींचे आरक्षण,न्याय,हक्क, रोजगार, शेती विषयक कायदे यावर विस्तृतपणे मुद्देनिहाय माहिती पटऊन सांगितले. झालेल्या चर्चेत गजानन नागापुरे,राजू पाटील मारकवार, डॉ.पद्माकर लेंनगुरे, संजय पडोळे, कैलास चलाख, प्रा.विजय लोनबले, आदींनी वेगवेगळ्या मुद्यावर चर्चा केली. बैठकीचे अध्यक्ष प्रा.रामभाऊ महाडोरे यांनी जिल्हास्तरीय महाअधिवेशनाला मुल तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल याची ग्वाही दिली.
OBC convention chandrapur बैठकीला सल्लागार. प्रा.गजानन नागापूरे, माजी प्राचार्य बंडू गुरनुले, निमछंद शेरकी, प्रा सिकंदर लेंनगुरे, गंगाधर कुंनघाडकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, लक्ष्मण खोब्रागडे, अशोक पुल्लावार, बल्लमवार सर, युवा आघाडी प्रमुख रोहित नीकूरे, भाजपा युवा मोर्चाचे राकेश ठाकरे, शिवसेना प्रमुख प्रशांत गट्टूवार, संदीप मोरे, कांग्रेस शहर अध्यक्ष, सुनील शेरकी, जितेंद्र लेंनगुरे, संदीप मोहबे, चौधरी सर,प्रशांत भरतकर, वाडगुरे सर, रामदास गुरनुले,राजू सूत्रपवार, शुभम लेनगुरे, बालगोविंद आदे, ईश्वर लोनबले, रुमदेव गोहने ,गुलाब शेंडे,वामन टिकले,संदीप वाढई, यांचेसह सर्व पक्षीय,सर्व जातीय ओबीसी बांधव उपस्थित होते. बैठकीचे संचालन ओबीसी राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी यांनी केले.प्रास्ताविक माळी महासंघाचे महासचिव गुरु गुरनुले यांनी केले.
अवश्य वाचा : 32 लाखाच्या गाडीत निघाला डिफेक्ट, चंद्रपुरातील प्रकार
आभार प्रदर्शन मुख्याध्यापक गंगाधर कुनघाडकर यांनी मानले.तालुका कार्यकारणी तालुका अध्यक्ष प्रा.रामभाऊ महाडोरे, उपाध्यक्ष नत्थु पाटील आरेकर, राजू पाटील मारकवार, किशोर घडसे, सचिव संजय पडोळे, सहसचिव गुरु गुरनुले, जितेंद्र बल्की, संघटक डॉ.पद्माकर लेंनगुरे, प्रशांत भरतकर, नितीन गुरनुले, ओंमदेव मोहरले यांचेसह अनेक ओबीसी बांधवांना कार्यकारिणी मद्ये सहभागी करून घेणार आहे. उपस्थित अनुभवी व ज्येष्ठ मंडळींना सल्लागार आणि उर्वरित कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य म्हणून सर्व मिळून सहकार्य करतील असे ठरविण्यात आले.