One State One Uniform maharashtra : एक राज्य एक गणवेश योजना महाराष्ट्रात लागू

One State One Uniform maharashtra शाळेला लागलेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सध्या संपत आल्याअसून काही दिवसात राज्यातील शाळा नियमितपणे सुरू होणार आहे, त्यासाठी सरकारने आता एक राज्य एक गणवेशाबाबत सूचना जारी केली आहे.

 

One State One Uniform maharashtra केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येत आहे. त्यासाठी सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एकसमान एक रंगाचे दोन गणवेश (One State One Uniform) उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. एकसमान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरुन उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अवश्य वाचा : चंद्रपुरात सुरू झाला अम्मा की पढाई उपक्रम

▪️इ.1 ली ते इ.4 थी मुली नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवारआकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक

 

▪️स्काऊट व गाईड गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवार गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक

 

▪️इयत्ता 5 वी मुली नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट

 

▪️स्काऊट व गाईड गणवेश  -मंगळवार, गुरूवार व शनिवार गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक

 

▪️इ.6 वी ते इ.8.वी मुली आणि इ.1 ली ते इ.8 वी मुली (ऊर्दू माध्यम) नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवारआकाशी निळ्या रंगाची कमीज, निळ्या गडद रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी

 

▪️स्काऊट व गाईड गणवेश -मंगळवार, गुरूवार व शनिवार गडद आकाश निळ्या रंगाची कमीज, गडद निळ्या रंगाची सलवार, गडद निळ्या रंगाची ओढणी

 

▪️इ.1 ली ते इ.7 वी मुले- नियमित गणवेश – सोमवार, बुधवार व शुक्रवार आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळया रंगाची हाफ पॅन्ट*

 

▪️स्काऊट व गाईड  -मंगळवार, गुरूवार व शनिवार स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट

 

▪️इ.8 वी मुले नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळया रंगाची फुल पॅन्ट

 

▪️स्काऊट व गाईड -मंगळवार, गुरूवार व शनिवार स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पैट

महत्त्वाचे : चंद्रपुरात स्मार्ट वीज मीटर विरोधात आपचे आंदोलन

One State One Uniform maharashtra शासन निर्णयात नमूद केल्यानुसार विद्यार्थ्यांनी सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश धारण करणे आवश्यक राहील. तसेच स्काऊट व गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवार या तीन दिवशी विद्यार्थ्यांनी सदर गणवेश परिधान करावा. स्काऊट व गाईड विषयाचा गणवेश असलेल्या दिवशी (मंगळवार, गुरुवार, शनिवार) स्काऊट व गाईड विषयाच्या तासिका ठेवण्यात येणार आहेत.

 

One State One Uniform maharashtra मोफत गणवेश योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे. राज्यातील शाळा 15 जून, 2024 पासून सुरू होत आहेत. महिला बचत गटामार्फत सद्यस्थितीत नियमित गणवेशाची शिलाई सुरू आहे. योजनेंतर्गत पात्र विद्यार्थी संख्या लक्षात घेता दुसऱ्या (स्काऊट गाईड) गणवेशाचे कापड शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात येत आहे.

अवश्य वाचा : शहरातील जीर्ण इमारतीवर चालला चंद्रपूर मनपाचा बुलडोझर

सदर स्काऊट गाईडच्या गणवेश शिलाईसाठी 100 प्रति गणवेश व अनुषांगिक खर्च 10 असे एका गणवेशासाठी एकूण 110 प्रति विद्यार्थी इतकी रक्कम  संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी वर्ग करावी, अशा सूचना देण्यात आले आहेत.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!