Press conference सत्ताधारी शासनाला प्रश्न विचारत सामान्यांना न्याय देण्याचं काम हे पत्रकार बांधवांचे असते, मात्र आज पत्रकार राजकीय नेत्यांच्या पायाशी लोटांगण घालताना दिसत आहे, आमदार, खासदार, मंत्री व राजकीय नेते यांच्या पायथ्याशी आज अनेक पत्रकार आश्रय घेताना दिसून येतात.
महत्त्वाचे : राज्यातील महिलांना मिळणार दरवर्षी 12 हजार रुपये
असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात घडला आहे. आगामी विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने वृत्तपत्रात इच्छुक उमेदवार बाबत वृत्त प्रकाशीत होत आहे.
मात्र हे करताना एकाची बाजू कमजोर तर जवळच्या नेत्याला ताकदवर व प्रशंसा करीत त्यालाच तिकीट मिळायला हवं असे वृत्त प्रकाशित करण्यात आले, मात्र सदर वृत्त हे चुकीचे आहे याकरिता त्या पत्रकाराला मी सांगितले मात्र दोन दिवसांनी माझ्या विरोधात अनेक निवेदने देण्यात आली हा प्रकार म्हणजे माझी प्रतिमा मलिन करण्याचा होता असा आरोप कांग्रेस नेते प्रकाश पाटील मारकवार यांनी 26 जून रोजी सायंकाळी 4.30 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
हे ही वाचा : पत्रकार संजय पडोळे यांना धमकी
Press conference ते म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर येथून मी कांग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागत आहो, यासाठी मी तयारी सुद्धा केली आहे, पण माझ्या व्यतिरिक्त इतरांनी सुद्धा कांग्रेस पक्षातून उमेदवारी मागितली आहे.
अश्यात मूल चे पत्रकार संजय पडोळे यांनी माझ्या विरोधात चुकीचे वृत्त प्रकाशीत केले व सदर प्रकार हा 2 ते 3 वेळा करण्यात आला.
नुकतेच त्यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून हवसे नवसे उमेदवार बाबत वृत्त प्रकाशित केले मात्र त्या वृत्तात एका कंत्राटदार असलेल्या इच्छुक उमेदवार बाबत त्याची प्रशंसा केली तर दुसऱ्या बाजूने इतर उमेदवार किती कच्चे आहे असे चित्र निर्माण करण्यात आले होते.
याबाबत प्रकाश पाटील यांनी पत्रकार संजय पडोळे यांना विचारणा केली, मी त्यांना कसलीही धमकी दिली नाही मात्र 2 दिवसांनी माझ्याविरोधात चुकीचे निवेदने देत माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार या लोकांनी सुरू केला.
Press conference पत्रकार संजय पडोळे यांनी चांगलं काम करावं त्यासाठी माझ्या शुभेच्छा राहणार मात्र काही कारण नसताना माझ्याविषयी असे चुकीचे काही लिहू नये, यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहो अशी प्रतिक्रिया कांग्रेस नेते प्रकाश पाटील मारकवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.