Shiv Sena Thackeray group 27 जूनला सामना मुखपत्रातून चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्रातील जिल्हाप्रमुखाच्या नियुक्ता जाहीर करण्यात आल्या.
यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात 2 जिल्हाप्रमुख होते मात्र आता 3 जिल्हाप्रमुख यांची नियुक्ती करण्यात आल्याने 2 जिल्हाप्रमुखानी या विरोधात बंड करीत स्वतः व 100 पदाधिकारी यांचे राजीनामे सोबत घेत थेट मुंबईला रवाना झाले.
अवश्य वाचा : चंद्रपुरातील या आमदाराच्या कृतीने भारावले शिक्षक
राज्यात 2 महिन्यानंतर विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे त्यापूर्वी ठाकरे गटातील या नियुक्ती ने चंद्रपुरात खळबळ उडाली आहे.
Shiv Sena Thackeray group जिल्ह्यातील 6 विधानसभेतील वरोरा, चिमूर व ब्रह्मपुरी ची जबाबदारी मुकेश जीवतोडे व चंद्रपूर, बल्लारपूर व राजुऱ्याची जबाबदारी संदीप गिर्हे यांच्यावर आहे, आता नव्या नियुक्ती मध्ये चंद्रपूर व वरोरा विधानसभेची जबाबदारी रवींद्र शिंदे कडे देण्यात आली असून चिमूर-ब्रह्मपुरी मुकेश जीवतोडे व बल्लारपूर व राजुरा विधानसभा संदीप गिर्हे यांच्याकडे आहे.
अवश्य वाचा : चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल बाबत महत्वाची माहिती
याबाबत संदीप गिर्हे यांनी सांगितले की आज सकाळी सदर प्रकार आम्हाला कळला असता आम्ही याबाबत पूर्व विदर्भ सम्पर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव व सम्पर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्याशी संपर्क साधत याबाबत विचारणा केली मात्र त्यांनी सांगितले की सदर नियुक्ती आम्हाला विश्वासात न घेता करण्यात आली आहे याबाबत आम्ही पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
Shiv Sena Thackeray group गिर्हे म्हणाले की आमचं असं काय चुकलं, आम्ही अनेक वर्षांपासून शिवसैनिक म्हणून काम करीत आहो, कार्यकर्ता ते जिल्हाप्रमुख अशी जबाबदारी आज पाळत आहो, मात्र सदर नियुक्ती ही अन्यायकारक आहे याबाबत आम्ही आमचे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविणार आहो.
नवे जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्याशी सम्पर्क केला असता ते म्हणाले आज पक्षाला संघटन बांधणीची गरज आहे, सध्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते, यासाठी आधी आपल्याला पक्ष संघटनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे, पक्षाने जी जबाबदारी दिली ती एक कार्यकर्ता म्हणून मी पार पाळणार आहो. कोरोना काळात आम्ही नागरिकांची सेवा केली, सहकार क्षेत्र असो की कृषी उत्पन्न बाजार समिती अश्या अनेक निवडणुका आम्ही एकहाती जिंकल्या, त्यामुळे आम्ही पक्षाला याबाबत आमचं काम दाखविले आहे.