smart electricity meter चंद्रपूर : – चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात वीज ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असून ही प्रक्रिया रद्द करण्यात यावी त्या विरोधात मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांना निवेदन देताना महेश मेंढे म्हणाले की आमच्या योजनेला विरोध असून सदर कारवाई तात्काळ थांबावी असे ते म्हणाले.
अवश्य वाचा : पोलीस ठाण्यात युवकाला अमानुषपणे मारहाण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकार
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात वीज ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सर्व्हे करण्यात येत आहे. वास्तविक वीज मीटर निवडी बाबत वीज कायदा 2003 कलम 55 नुसार ग्राहकांना स्वातंत्र आहे . मात्र वीज वितरण कंपनी कडून स्मार्ट वीज मीटर लावण्यासाठी ग्राहकांच्या घरोघरी सर्व्हे करण्यात येत असून स्मार्ट मीटर लावणे एकप्रकारे बंधनकारक असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे . ग्राहकांना वेठीस धरण्याच्या महावितरणच्या या धोरणाला आम्ही विरोध दर्शवित आहोत.
smart electricity meter संपूर्ण देशभरात प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय नुकत्याच काही महिन्यांपूर्वी शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात याबाबतचा सर्वे सुरु आहे. मात्र स्मार्ट मिटरला जिल्ह्यातील वीज ग्राहकांमधून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. विशेष म्हणजे प्रीपेड स्मार्ट मीटर जिल्हा वासियांसाठी तापदायक ठरणार आहे.
महत्त्वाचे : चंद्रपुरात एकाने 32 लाखांचे वाहन घेतले मात्र त्यामध्ये निघाला डिफेक्ट
देशभरात प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय नुकत्याच काही महिन्यांपूर्वी शासनाने घेतला आहे. स्मार्ट मीटरची सुरुवात मेट्रो सिटीपासून करण्याचा शासनाचा मानस आहे. प्रीपेड मीटरच्या बाबतीत गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वे सुरु करण्यात आला आहे. सर्वेदरम्यान जिल्ह्यातील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला आहे. विशेष म्हणजे स्मार्ट मीटरच्या संकल्पनेला राज्यातील वीज संघटनेचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे.
smart electricity meter चंद्रपूर जिल्ह्यात बहुतांश वर्ग हा ग्रामीण भागात असून आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे.त्यामुळे प्रीपेड मिटर लावल्यास आधी पैसे भरून वीजवापरण्याची क्षमता ग्राहकांमध्ये नाही. तसेच ऐनवेळी रिचार्ज संपल्यास तोही वेळेतच करण्याची आर्थिक परिस्थिती नाही अशी वास्तविकता जिल्ह्यातील वीज ग्राहकांची आहे, नव्हेतर ती सर्वश्रुत आहे. अन्न, वस्त्र, निवारा व वीज मानवी जीवनातील या चार मूलभूत गरजा असल्याचे पंतप्रधान भाष्य करतात. तसेच यासंदर्भात सरकार नेहमीच सकारात्मक असल्याचं बोलतात. याच मूलभूत गरजांच्या बाबतीत शासनाकडून अन्यायाचा पावित्रा का असाअनुत्तरितप्रश्न निर्माण झाला आहे.
स्मार्ट वीज मीटर चा ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. यामध्ये बदल न केल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन आगामी दिवसात करण्यात येईल असे महेश मेंढे म्हणाले.
या संदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. चर्चा सकारात्मक झाली असून यावेळी काँग्रेसचे नेते महेश मेंढे यांच्यासह रोशन रामटेके, पियुष तुपे, अविनाश मेश्राम , वैभव अमृतकर यांची उपस्थिती होती.