Smart Prepaid Recharge Meter लोकसभा निवडणूक संपताच आता स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचे काम जोरात सुरू करण्यात आले आहे, मात्र हा स्मार्ट मीटर काय याबाबत सामान्य जनतेमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
महत्त्वाचे : चंद्रपूरच्या कामगारांनी पंतप्रधान मोदी यांना लिहले रक्ताने पत्र
12 जून ला चंद्रपूर-गडचिरोली वीज वितरण कार्यालय बाबूपेठ येथे आम आदमी पक्षाच्या वतीने स्मार्ट वीज मीटर विरोधात आंदोलन करण्यात आले.
Smart Prepaid Recharge Meter ऑगस्ट 2023 मध्ये स्मार्ट वीज मीटर बाबत निविदा मंजूर करण्यात आली होती, त्यानंतर हे काम अदानी, एनसीसी व मोंटेकारलो कंपनीला मिळाले.
वीज मीटर ची किंमत 6 हजार 300 असताना सरकार 12 हजार रुपयांना हे मीटर खरेदी करीत आहे, हा मोठा घोळ यामध्ये आहे.
अवश्य वाचा : तर अधिकारी व कंत्राटदार यांची गय केली जाणार नाही – विजय वडेट्टीवार यांची तंबी
आज आप तर्फे करण्यात आलेल्या आंदोलनात आप चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी सांगितले की गोर गरीब जनता आधीच महागाई पायी त्रासली आहे आणि सरकार त्यांच्या वर रिचार्ज करणारे वीज मीटर थोपविण्याचे काम करीत आहे, रिचार्ज करण्यासाठी नागरिकांजवळ पैसे नसेल तर वीज पुरवठा खंडित होणार, या सरकारच्या धोरणाला आमचा विरोध आहे, याचा निषेध म्हणून आम्ही आज आंदोलन करीत असल्याची माहिती दिली.
Smart Prepaid Recharge Meter निषेध आंदोलनानंतर मयूर राईकवार यांनी मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांना निवेदन दिले, यावेळी जिल्हा संगठन मंत्री शंकर सरदार, राजकुमार नगराळे, योगेश गोखरे, परमजीत सिंग, शिवम ठाकूर, सुजाता देठे, नाजमा बेग यांची उपस्थिती होती.