Social issues chandrapur चंद्रपूर महानगरपालिका नगरसेवकांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपला होता, मात्र त्यानंतर अनेक भागात समस्यांचे डोंगर उभे राहिले.
अवश्य वाचा : बर्ड फ्लू चा धोका वाढला
शहरातील बंगाली कॅम्प भागात मागील वर्षभरापासून नाल्यांची स्वच्छता न केल्याने विविध भागांतील नाल्या घाणीने साचल्या आहे, प्रशासन या समस्येवर डोळेझाक करीत आहे.
Social issues chandrapur यावर प्रभागाचे माजी नगरसेवक अजय सरकार यांच्याकडे नागरिकांनी प्रभागात होत असलेली घाणी बाबत सूचना दिली, सरकार यांनी महानगरपालिका प्रशासनाला याबाबत निवेदन देत माहिती दिली मात्र यावर प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही.
महत्त्वाचे : दहावी पास विद्यार्थी होणार इंजिनिअर
6 जून रोजी प्रभागातील नागरिकांना सोबत घेत अजय सरकार यांनी मनपा प्रशासनाला याबाबत निवेदन दिले 2 दिवसात प्रभागातील नाल्यांची स्वच्छता झाली नाही तर ज्या भागातील नाल्यांमध्ये घाण पसरली आहे ती सर्व घाण सोमवारी मनपा कार्यालयात आणून टाकणार असा इशारा सरकार यांनी मनपा प्रशासनाला दिला.