Sunday market chandrapur जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून संडे मार्केटच्या फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या आणि त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी कशा दूर करता येईल या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
Drugs in Chandrapur : शहरातील बाबूपेठ भागात अंमली पदार्थ? आपचे पोलीस प्रशासनाला निवेदन
फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना ज्या समस्या येतात त्या समस्या संबंधी प्रश्नांना घेऊन काँग्रेसच्या माध्यमातून निश्चितच लढा देण्यात येईल तसेच गोरगरीब जनतेच्या पाठीशी सदैव राहणार असे आश्वासन काँग्रेस नेते महेश मेंढे यांनी दिले.
Sunday market chandrapur कार्यक्रमादरम्यान फूटपाथ वर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यवसायिकाच्या पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून काँग्रेस नेते महेश मेंढे यांच्या माध्यमातून छत्र्या वाटप करण्यात आले.
अवश्य वाचा : टायगर अभि जिंदा है – सुधीर मुनगंटीवार
जनसंवाद कार्यक्रमामध्ये मंचावर सामाजिक कार्यकर्ते सय्यद हाजी, अधिवक्ता मोहम्मद रफीक शेख, काँग्रेस युथ महासाचिव कादर शेख, संडे मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष हमीद रजा राजा भाई आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मोठ्या संख्येने संडे मार्केट असोसिएशन चे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन मोहम्मद इरफान शेख यांनी केले.