Surjagad Iron Ore Company : पर्यावरण परवानगी रद्द करा – राजेश बेले

Surjagad Iron Ore Company सुरजागड लोह खनिज खाण मेसर्स लॉयडस मेटल व एनजी लि. तह एटापल्ली जिल्हा गडचिरोली या प्रकल्प द्यारे पर्यावरण कायद्याचे वारंवार उल्लंघन होत असल्यामुळे या प्रकल्पाची पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी अशी मागणी संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली आहे.

प्रभागातील घाण मनपा कार्यालयात टाकणार – अजय सत्कार

सुरजागड लोह खनिज खाण या प्रकल्पाद्वारे हवेमध्ये खाणीतून निघालेली लाल मातीचे कण व लोह दगडातील सूक्ष्म कण हवेमध्ये उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे. लोह खनिज खाणीतील घातक रासायनिक द्रव खाणीला लागून असलेल्या नाल्या द्वारे जंगलातून गोदावरी नदीमध्ये सोडत असल्यामुळे तेथील मानवी जीव, जल प्राणी, वन्य प्राणी, पाळीव प्राणी यांच्या जीवाला व आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे व आजाराची लागण नवजात शिशु चा मृत्यू, दमा, हृदय विकार, त्वचा रोग, डोळ्याचे विकार, मेंदूचे विकार, क्षयरोग, कर्करोग अशा अनेक आजाराची सुद्धा लागण झालेली आहे.

 

Surjagad Iron Ore Company लोह खनिज खाणीतून निघणार्या लोह खनिज मधून निघणारा ओवर बर्डन हाताळणी करते वेळी हवेमध्ये शुस्म कण उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजन होत नाही.

देशात पुन्हा बर्ड फ्लू चा धोका

लोह खनिज व खाणीतून निघणारे ओवर बर्डन ट्रक व हायवा गाडीमध्ये हाताळणी करते वेळी हवेमध्ये सूक्ष्म कण उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे, तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजना होत नाही जड वाहतुकी द्वारा कायद्याचे उल्लंघन करून वाहतुकीमुळे सुरजागड लोह खनीज प्रकाल्पासून एटापल्ली, आलापल्ली, गोंडपिपरी, आक्सापूर, पोम्भूर्ण, केळझर, कोठारी बामणी या गावातील रस्ते व आजूबाजूचा परीसर लोह खनिजाचे कण हवेमध्ये उडते.

 

Surjagad Iron Ore Company लोह खनिज खाणीतून निघणारे घातक रासायनिक द्रव खाणीला लागून असलेल्या नाल्या द्वारे जंगलातून नदीमध्ये सोडत असल्यामुळे घातक जल प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजन होत नाही.

शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार दामिनी

Surjagad Iron Ore Company सुरजागड लोह खनिज खाण या प्रकल्प द्यारे पर्यावरण कायद्याचे वारंवार उल्लंघन होत असल्यामुळे या प्रकल्पाची पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी. अशी मागणी बेले यांनी केली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!