tata harrier top model black colour : चंद्रपुरात घडला असा प्रकार की ग्राहकाने टाटा ची गाडी लावली शोरूम बाहेर

tata harrier top model black colour चंद्रपुरात 32 लाखांची गाडी घेतल्यावर एका ग्राहकांची फसवणूक झाली मात्र त्यानंतर ग्राहकाने कुणाचीही फसवणूक होऊ नये यासाठी अनोखी अशी शक्कल लढवली आहे.

अवश्य वाचा : महिलांनी उचलली 5 हजार वृक्षारोपणाची जबाबदारी

चंद्रपुरातील सुनिल आहुजा यांनी मार्च महिन्यात टाटा कंपनीची हॅरिअर xuv वाहन तब्बल 32 लाख रुपयात खरेदी केले, त्यानंतर वाहनाच्या पेंट ला नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी वाहनाचे टेपलॉन करण्याचे ठरविले, हे काम करीत असताना वाहनाच्या डाव्या बाजूला असलेल्या दाराला रिपेंट करण्यात आल्याचे समजले, त्यानंतर आहुजा यांनी टाटा कंपनीच्या जायका मोटर्स शोरूम ला भेट दिली, याबाबत त्यांना तक्रार सुद्धा केली मात्र त्याचे निराकरण झाले नाही.

 

आहुजा यांनी मागील महिन्याभरापासून टाटा कंपनी व जायका मोटर्स च्या मागे चपला झिजविण्याचे काम केले तरीसुद्धा काही उपयोग झाला नाही.

महत्त्वाचे : बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, मेगाभरती

tata harrier top model black colour त्यानंतर 8 जून ला आहुजा यांनी थेट जायका मोटर्स शोरूम बाहेर आपले वाहन उभे ठेवत त्यावर टाटा कंपनीची गाडी कुणीही घेऊ नका, हे फसवणूक करतात अश्या आशयाचे बॅनर लावले.

आहुजा यांनी म्हटले की जर माझ्या समस्येचे निराकरण झाले नाही तोपर्यंत मी आपले वाहन इथेच उभे ठेवणार, त्यानंतर ग्राहक मंचात याबाबत दाद मागणार.

tata harrier top model black colour याबाबत जायका मोटर्स चे मिलिंद कवाडे यांच्याशी याबाबत चर्चा केली असता ते म्हणाले की आम्ही आहुजा यांच्या तक्रारीची दखल घेतली असून लवकर त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!