देशात यंदा तापमानाने हाहाकार माजविला होता, देशातील अनेक भागात तापमानाने उच्चांक गाठला ज्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागल्या, याच एकमेव कारण म्हणजे हवामानात होणारा बदल आणि मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड.
अवश्य वाचा : बँकिंग क्षेत्रात काम करण्याची सुवर्णसंधी, निघाली मेगाभरती
देशासहित विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा यंदा तापमानाने उच्चांक गाठला होता, आता प्रत्येक नागरिकांनी वृक्षारोपण करावे असा संदेश शहरातील उत्कृष्ट महिला मंचाने दिला आहे. यासाठी स्वतः आधी महिला मंच पुढाकार घेत आहे.
अवश्य वाचा : जिल्हाधिकारी गौडा यांची राज्यसमितीवर निवड
चंद्रपूर शहरात यंदा 5 हजार वृक्षारोपणाचा निर्धार उत्कृष्ट महिला मंचाने केला आहे, यासाठी तयारी सुद्धा सुरू करण्यात आली असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.
उत्कृष्ट महिला मंचाच्या अध्यक्षा छबु वैरागडे यांनी याबाबत माहिती दिली की उन्हाळ्यात नागरिकांचे काय हाल होतात हे संपूर्ण देशाने यंदा बघितलं आहे, जर हे वातावरण आपल्याला बदलायचे असेल तर त्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करायला हवी, आम्ही या मोहिमेद्वारे शहरात 5 हजार झाडांचे वृक्षारोपण करणार आहोत, विशेष बाब म्हणजे वृक्षारोपण केल्यावर त्याचे संगोपन सुद्धा आपणच करणार आहोत अशी प्रतिक्रिया वैरागडे यांनी यावेळी दिली.
अवश्य वाचा : चंद्रपूर शहरातील या भागात वाढतेय गुन्हेगारी
या सर्व उपक्रमाची माहिती छबु वैरागडे यांनी मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांच्याशी सामायिक केली असून या मोहिमेत मनपाचे सहकार्य उत्कृष्ट महिला मंचाला लाभणार आहे, सदर उपक्रमाबाबत विपीन पालिवाल यांनी उत्कृष्ट महिला मंच अध्यक्ष छबु वैरागडे व सदस्यांचे कौतुक केले.
प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत भाग घ्यावा यासाठी आम्ही वृक्षारोपण करीत त्या वृक्षाचे संगोपन करणाऱ्या नागरिकाला प्रोत्साहन म्हणून पुरस्कार सुद्धा देणार आहो.
शहरातील अनेक भागात मोकळी जागा आहे त्या भागात हे वृक्षारोपण करण्यात येईल अशी माहिती वैरागडे यांनी दिली आहे.