Weather Alert in India : रेड, ऑरेंज, यलो व ग्रीन अलर्टचा अर्थ काय?

Weather Alert in India सध्या राज्यात काही ठिकाणी मान्सूनचे आगमन झाले आहे मात्र अनेक जिल्ह्यात पाऊस पडलेला नाही, हवामान खाते वारंवार पावसाचे अलर्ट देत आहे, मात्र हे अलर्ट नेमकं काय सांगतात याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत.

महत्त्वाचे : एक राज्य एक गणवेश योजना 15 जूनपासून लागू

काय सांगतात, पावसाचे अलर्ट ?

 

 रेड अलर्ट: रेड अलर्ट म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता. अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज असतो. त्यामुळे नागरिकांना घरीच थांबण्याच्या सूचना दिल्या जातात.

 

ऑरेंज अलर्ट: मुसळधार पावसाची शक्यता. कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता. आवश्यक असेल तरच बाहेर पडण्याचे निर्देश असतात.

 

यलो अलर्ट: नैसर्गिक संकटाची शक्यता. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे सावधगिरीचा इशारा असतो.

 

 ग्रीन अलर्ट: पावसाची परिस्थिती सामान्य असते. कुठलेही निर्बंध घालण्याची गरज नसते.

महत्त्वाचे : जातवैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणार हे पुरावे

Weather Alert in India मान्सून सक्रिय झाल्यानंतर भारतीय हवामानशास्त्र विभाग नागरिकांसाठी विविध अलर्ट जारी करते. पावसाचा अंदाज काय असेल आणि नागरिकांनी कोणती काळजी घ्यायला हवी, यासाठी हे अलर्ट महत्त्वाचे असतात. या पार्श्वभूमीवर विविध अलर्टचे निकष काय असतात, याची ही छोटीशी झलक.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!