Who is Kulwinder Kaur? अभिनेत्रीतून राजकारणी बनलेली कंगना राणावत सोबत चंदीगड विमानतळावर झालेल्या थापड घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. तपासणीदरम्यान सीआयएसएफच्या महिला सुरक्षा रक्षकाने थापड मारल्याच्या घटनेनंतर कंगना राणावत ने व्हिडिओ शेअर करून संपूर्ण माहिती दिली.
एका व्हिडिओमध्ये कंगना राणावत म्हणाली की ती सुरक्षित आणि बरी आहे, पण पंजाबमधील वाढत्या दहशतवादामुळे ती चिंतेत आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर कंगनाने एक स्टेटमेंट जारी केले की, महिला कॉन्स्टेबल तिच्याकडे आली, कंगना म्हणाली, ‘तिने मला थप्पड मारली आणि मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. मी तिला असे का केले असे विचारल्यावर हवालदाराने सांगितले की, ती शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देते.
अवश्य वाचा : शेतकऱ्यांच्या मदतीला धावली दामिनी
Who is Kulwinder Kaur? कंगना राणावत ला थापड मारणाऱ्या सीआयएसएफ जवान कुलविंदर कौरला तात्काळ ताब्यात घेण्यात आले आणि चौकशीनंतर निलंबित करण्यात आले.
चंदिगड विमानतळावर तैनात असलेल्या सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौर या कपूरथला जिल्ह्यातील तलवंडी चौधरी पोलीस ठाण्यातील माई वाल या गावातील रहिवासी आहेत. शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनाने म्हटले होते की, दिल्लीत शेतकरी आंदोलनात धरणे देणाऱ्या महिला प्रत्येकी 100 रुपये घेऊन बसतात.
Who is Kulwinder Kaur? कुलविंदर कौर 35 वर्षांची असून तिचे कुटुंब पंजाबमधील सुलतानपूर लोधी येथील रहिवासी आहे. कुलविंदर कौर गेल्या 15 वर्षांपासून सीआयएसएफमध्ये काम करत आहेत आणि तिचा आतापर्यंतचा रेकॉर्डही स्वच्छ आहे. कुलविंदरने नोकरीत असताना आपल्या सर्व जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडल्या आहेत. तिचा नवराही सीआयएसएफ जवान आहे. कुलविंदर तिच्या पतीसोबत कपूरथला येथे राहते आणि तिला 2 मुले आहेत. त्यांचा भाऊ शेर सिंग हा शेतकरी नेता असून किसान मजदूर संघर्ष समितीमध्ये संघटन सचिव पदावर आहे.
महत्त्वाचे : जातवैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी हे पुरावे लागतील?
कुलविंदर कौर गेल्या 2 वर्षांपासून चंदिगड विमानतळावर तैनात आहेत आणि पूर्ण प्रामाणिकपणे आपले काम करीत आहे. त्यांचे कुटुंब शेतकरी कुटुंबातील असल्याने ते शेतकरी चळवळीशी जोडले गेले आहे. कंगना राणावत सोबत झालेल्या गैरवर्तनानंतर कुलविंदरचा चंदीगड विमानतळावरून एक व्हिडिओही समोर आला होता, ज्यामध्ये त्यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान भाजप खासदारावर विरोधी वक्तव्य केल्याचा आरोप केला होता.
Who is Kulwinder Kaur? महिला कर्मचाऱ्याने कथित व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘कंगना यांनी विधान केले होते की दिल्लीतील शेतकरी 100-200 रुपये घेऊन आंदोलन करत आहेत. त्यावेळी माझी आई ही आंदोलकांमध्ये होती.