Workers’ movement CMPL या माती उत्खनन कंपणीने कार्यरत स्थानिक कामगारांना पत्र पाठवीत तुमचं काम संपलं आहे, अश्या आशयाचे पत्र पाठवीत त्यांना कामावरून कमी करण्याचा प्रयत्न झाला, सदर कंपनीचे काम राजुरा येथील सास्ती भागात सुरू आहे, त्या कंपनीत कामगारांना स्थलांतरित करावे अशी विनंती कामगारांनी केली मात्र त्यांचं काही ऐकल्या गेलं नाही.
अवश्य वाचा : हंसराज अहिर यांच्या प्रयत्नांना यश
त्यामुळे कामगारांनी राजुरा तहसील कार्यालय समोर 10 जून पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले, कामगार व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे, मात्र त्यांना न्याय देण्याचं काम कुणी करीत नाही आहे, अश्यात सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी कामगारांच्या लढ्यात उडी मारली व त्यांना समर्थन देत त्या आंदोलनात सामील झाले.
हे ही वाचा : चंद्रपुरात neet परीक्षा घोटाळा विरोधात हजारो विद्यार्थी उतरले रस्त्यावर
आतापर्यंत कामगारांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या रक्ताने न्याय द्या असे पत्र लिहले, त्यानंतर सुद्धा कामगारांची सुनावणी झाली नाही. कामगारांनी मुंडन आंदोलन सुद्धा केले पण काही फायदा झाला नाही.
अनैशा वाहन चालक कामगार संघटना चे संस्थापक सूरज उपरे व भूषण फुसे या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे.
Workers’ movement 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला, आणि चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर ह्या निवडून आल्या, 6 जून ला अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे अध्यक्ष सूरज उपरे सहकाऱ्यांना सोबत घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेत त्यांना कामगारांच्या आंदोलनाबाबत माहिती दिली.
महत्त्वाचे : मुलीच्या लग्नासाठी महाराष्ट्र सरकार देणार 25 हजार रुपये
मी कंपनीशी एकदा चर्चा करते त्यांनतर आपल्याला सांगते असे उत्तर खासदार धानोरकर यांनी कामगारांना दिले, त्यानंतर खासदार धानोरकर यांनी त्यांना कळविले की CMPL कंपनीचा कंत्राटदार तुम्हाला न्याय देऊ शकत नाही, आम्ही त्यांना कामावर घेणार नाही असे उत्तर दिले.
Workers’ movement खासदार धानोरकर यांच्या या उत्तराने कामगार काहीशे हताश झाले मात्र त्यांनी न खचता आंदोलन सुरूच ठेवले. आज सूरज उपरे यांनी धानोरकर यांच्याशी झालेली भेट याबाबत माहिती दिली.
सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी यावेळी माहिती दिली की जर कामगारांना जनप्रतिनिधी न्याय देत नसेल तर त्यांचा वाली कोण?
विशेष म्हणजे खासदार धानोरकर यांनी अधिकारी व कंपनी व्यवस्थापनाची बैठक बोलवायला हवी होती त्या बैठकीतून काही मार्ग निघाला असता मात्र तसे काही झाले नाही, चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे, याठिकाणी हजारो कामगार कार्यरत आहे.
मात्र आज कामगारांना अश्या हिटलर शाही विरोधात लढा द्यावा लागत आहे, त्यावर लोकप्रतिनिधी हे हतबल अवस्थेत बसले आहे, ही या जिल्ह्याची मोठी शोकांतिका आहे.
Workers’ movement एकीकडे बामणी प्रोटिन्स चे कामगार आपल्या कुटुंबासहित लढाई लढत आहे तर दुसरीकडे CMPL चे कामगार सुद्धा असाच लढा लढत आहे, त्यांना लोकप्रतिनिधी व शासनाकडून न्याय हवा मात्र ही व्यवस्था त्यांना न्याय देऊ शकत नसल्याने आता पुढे काय करायचं? हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा आहे.