letter to Prime Minister Modi CMPL माती उत्खनन या कंपनीतील कार्यरत स्थानिक कामगारांना कंपनीचे काम संपल्याचे सर्व कामगारांना पत्र पाठवून कामावरून डावलण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे. कारण सदर कंपनीचे दुसरे काम हे राजुरा विधानसभा क्षेत्र सास्ती इथे सुरु आहे.
अवश्य वाचा : महाराष्ट्रात एक राज्य एक गणवेश योजना लागू
कंपनीने स्थानिक कामगारांना कामावरून कमी केल्यास त्यांच्यावर तसेच त्याच्या परिवारावर उपासमारीची वेळ येणार. स्थानिक कामगारांना कामावरून न काढता सास्ती येथे स्थलांतर करण्यात यावे.
letter to Prime Minister Modi याकरिता अनैशा वाहन चालक कामगार संघटना चे संस्थापक अध्यक्ष सुरज भाऊ उपरे तसेच सामजिक कार्यकर्ते भूषणभाऊ फुसे यांच्या नेतृत्वात राजुरा तहसील कार्यालयासमोर दिनांक 10 जून 2024 रोज सोमवार ला बहुजनांच्या महापुरुषांना अभिवादन करून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आले.
महत्त्वाचे : नोकरीच्या शोधात आहात तर ही बातमी तुमच्यासाठी
letter to Prime Minister Modi बेमुदत धरणे आंदोलनात आंदोलनकर्ते आकाश ताकसांडे, ऋषी चौधरी, अजय इग्रपवार, साई कुमार मोगलीवार, राकेश चेनमेंवार, श्रीकांत जलावार, पांडुरंग मंगाम, आशिष पझारे,या वेळेस माणिक संजीव, दशरथ कोंडावार, मिथुन कांबळे,राहुल राठोड,विशाल सल्लम, संकेत भादिकर,शंकर काळे,प्रवीण जेल्लेल, प्रवीण चेनवेंनवार,उपस्थित होते.
आंदोलनाचा दुसरा दिवस
आज दिनांक 11 जून 2024 रोजी आमच्या न्याय हक्कासाठी व शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलनकर्त्यानी स्वतःच्या रक्ताने देशाचे पंतप्रधान मा. मोदीजींना पत्र लिहिले आहे.पत्राचा मजकुर “मा.मोदीजी आम्हाला न्याय द्या” असा आहे.