World Environment Day दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्यामुळे वातावरणाचा समतोल बिघडत आहे.त्यामुळेच मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने सामाजिक बांधिलकी जोपासून किमान एक तरी झाडं आपल्या आयुष्याच्या शुभदिनी लावून त्याचे संगोपन करावे असे मौलिक विचार जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वृक्षरोपन कार्यक्रमाप्रसंगी महिला बचतगटांच्या संस्थापक अध्यक्षा सौ.चंदाताई वैरागडे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
अवश्य वाचा : तर प्रभागातील घाण चंद्रपूर मनपा कार्यालयात आणून टाकणार
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बाबूपेठ महिला बचतगट तर्फे बजरंग क्रीडा संकुल बाबूपेठ परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमात सौ पुष्पाताई डोनिवार यांनी निसर्गावर महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी अतिशय सुंदर गाणं म्हटलं,कार्यक्रमाला बचतगटाच्या संस्थापक अध्यक्षा चंदाताई वैरागडे, निताताई चन्ने, नम्रताताई मोरे,रेखाताई वैरागडे, शिल्पाताई आंबटकर, लीलाताई बुटले, वर्षाताई साखरकर, स्नेहलताई अंबागडे यांच्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले.
World Environment Day कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रेखाताई तडसे प्रास्ताविक शालिनीताई काळे,आणि आभार प्रदर्शन सौ.पूनम नवले यांनी केले ,या कार्यक्रमात बचतगटातील जागृत सदस्य महिलांची उपस्थिती होती.