Young chanda brigade सीबीएससी व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत इयत्ता १० वी आणि १२ वी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने 9 जुन २०२4 रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे सायंकाळी 5 वाजता सत्कार कार्यक्रमाचे आयोजन आले आहे.
अवश्य वाचा : आता तुमचे वीज मीटर होणार स्मार्ट
सदर कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार. या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Young chanda brigade दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा 10 वी आणि 12 वीच्या परिक्षेत यश संपादन करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन यंग चांदा ब्रिगेडच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या सत्कार कार्यक्रमात 12 वी च्या परीक्षेत 75 टक्के च्या वर गुण प्राप्त करणाऱ्या आणि 10 वी च्या परिक्षेत 80 टक्के च्या वर गुण प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
महत्त्वाचे : चंद्रपुरात या मृतदेहाची ओळख पटेना
यासाठी सदर गुणवंत विद्यार्थ्यांना जैन भवन जवळील आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात दि. 8 जून २०२4 पर्यंत गुणपत्रिकेची प्रत जमा करावी किंव्हा https://bit.ly/4bF3655 या संकेत स्थळावर नोंदणी करून घ्यावी असे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Young chanda brigade सदर कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक वृंद, शाळा संस्थापक अध्यक्ष तसेच महानगरातील विविध क्षेत्रातील नागरिक व शिक्षण क्षेत्राशी निगडीत मान्यवर व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.