Youth killed in train collision : अमरावती येथील 2 युवकांचा चंद्रपुरात मृत्यू, नेमकं कारण काय?

Youth killed in train collision भद्रावती- तालुक्यातील मुरसा येथे रेल्वे पटरी जवळ दोन युवकांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याचे प्रकरण 24 जून ला सकाळी 11 वाजता उघडकीस आले.
या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
मृतक संदीप सहादेव बेलसरे वय 25 राहणार जामणी (आर ) तालुका चिखलदरा जिल्हा अमरावती व दुसरा मृतक विजय तुलसाराम मावसकर वय 28 राहणार राहणार जामनी (आर ) असे दोन्ही मृतकाचे नाव आहे.

अवश्य वाचा : संविधानाचा जयघोष करीत प्रतिभा धानोरकर यांनी घेतली खासदारकी ची शपथ

मृतक युवक हे अत्यंत हलाखीच्या कुटुंबातील आहे, त्यांच्या मृत्यूची वार्ता आई-वडीलपर्यंत पोहचली असता त्यांना भद्रावती येथे पोहचायला वेळ लागला, कुटुंबाला आधार मिळावा यासाठी संदीप व विजय हे एकाच गावातील युवक घुग्गुस येथील लोयड कंपनी मधील केवी कन्स्ट्रक्शन कंपनीत मजुरी करायला आले होते.
विशेष बाब म्हणजे ते दोघेही काही दिवसांपूर्वी घुग्गुस येथे आले होते. घटनेच्या दिवशी दोन्ही युवक कंत्राटदाराकडून पैसे घेत घुग्गुस बाजारात जातो असे सांगत बाहेर निघाले होते. मात्र त्यादिवशी ते दोघे परतले नाही. दुसऱ्या दिवशी दोघांचे मृतदेह भद्रावती तालुक्यातील मुरसा गावाजवळील रेल्वे पटरी जवळ आढळले.

Youth killed in train collision याबाबत लोको पायलट यांनी याबाबत भद्रावती पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यांनी सांगितले की दोन्ही युवक रेल्वे पटरी वर बसून होते, त्यानंतर त्यांना रेल्वेने धडक दिली. या धडकेत दोघे जागीच ठार झाले.

माहिती मिळाल्यावर भद्रावती पोलीस घटनास्थळी दाखल झाले, यावेळी मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. 25 जून ला दोघांचे शवविच्छेदन करीत त्यांचे मृतदेह कुटुंबाला सोपविण्यात आले. भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गेडाम करीत आहे.

अवश्य वाचा : खरीप पीकविमा बाबत ही गोष्ट लक्षात ठेवा

Youth killed in train collision सदर घटनेत नेमकं काय घडलं, हे घटनेच्या दुसऱ्या दिवशी कुणाला कळले नाही, याबाबत पोलिसांशी सम्पर्क साधला असता त्यांनीही आधी माहिती दिली नाही, अखेर सायंकाळी याबाबत माहिती मिळाली.
दोन्ही युवक गरीब कुटुंबातील असल्या कारणाने पोलिसांनी जी तत्परता दाखवायला हवी होती ती दाखवली नाही.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!