Accident news चंद्रपूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या गावाजवळ 23 जुलैला दुपारच्या सुमारास दोन एसटी बसेस चा आपसात समोरासमोर अपघात झाला, सुदैवाने या अपघातात कसलीही जीवितहानी झाली नसली तर बसेसचे मोठे नुकसान झाले आहे.
अवश्य वाचा : इमर्जन्सी लाईट चा उजेड आणि राजकीय पदाधिकारी व सट्टा किंग गुंतले जुगारात
Accident news दुपारच्या सुमारास चंद्रपूर वरून मूल कडे जाणारी बस व ब्रह्मपुरी वरून चंद्रपूर कडे येणाऱ्या राज्य परिवहन विभागाच्या बस मधील नियंत्रण सुटल्याने दोन्ही बसेसची समोरासमोर धडक झाली, या धडकेत बस चा समोरील भाग चक्काचूर झाला.
या घटनेनंतर या मार्गावर वाहतूक व्यवस्था अक्षरशः खोळंबून गेली होती, घटनेची माहिती मिळाल्यावर रामनगर पोलीस निरीक्षक सुनील गाडे आपल्या चमुसहित दाखल झाले, त्याचवेळी माजी नगरसेवक पप्पू देशमुख सुद्धा घटनास्थळी आले, पोलीस व नागरिकांनी मिळून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.
बसमध्ये 30 ते 40 प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे, सुदैवाने कुणालाही या अपघातात कसलीही दुखापत झाली नाही.