Agriculture and Environment Day मुल – वी.तू.नागपुरेजी एक लोकसेवक होते. ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व शेतकऱ्यांचा विकास हाच ध्येय ठेऊन कार्य केले असे विचार संस्थेचे अध्यक्ष व समारंभाचे अध्यक्ष एड.बाबासाहेब वासाडे यांनी व्यक्त केले. स्व. वि.तू.नागपुरे सामाजिक कार्य व सेवा प्रतिष्ठान मुल तर्फे कर्मवीर महाविद्यालयात १ जुलै २०२४ रोजी सकाळी ११-०० वाजता. स्व.वी.तू.नागपुरे जयंती व कृषी पर्यावरण दीन समारोहाचे आयोजन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
अवश्य वाचा : लायटर वरून पत्नीवर प्राणघातक हल्ला
कार्यक्रमाचे उद्घाटक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.राममोहन बोकारे यांनीही नागपुरे जींच्या जीवन कार्याचा उल्लेख केला. प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव एड.अनिल वैरागडे, सदस्य श्री. पुल्लकवार, माजी प्राचार्य ते.क.कापगते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिता वाळके, डॉ .राम दांडेकर,प्राचार्य अशोक झाडे, प्रा.किसान वासाडे, प्राचार्य बोलीवार,आदी मान्यवर उपस्थित होते.
महत्त्वाचे : लाडकी बहीण योजनेसाठी आजपासून अर्ज सुरू
Agriculture and Environment Day मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या समारोहात तालुक्यातील उत्कृष्ठ शेतकरी म्हणून भीमराव गेडाम यांचा सन्मान, तसेच तालुक्यातील आदर्श शिक्षक म्हणून जी.प. शिक्षक केळझर दयाराम भाकरे, महेश उमरे यांचा सन्मान केला. तसेच संस्थेमधून दीर्घ सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले शिक्षक प्रा.धनंजय चुदरी, सुषमा रंगारी, ऋषी मुंड्रे, रमेश डांगरे,निता कारगिर्वार, उंदिरवाडे यांचाही संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सोबतच गुणवंत विद्यार्थ्यंचा गौरव, निवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तरी या समारोहाला गुणवंत विद्यार्थी,२० वी मद्ये हितेश गावतुरे, कुणाल सतीश खोब्रागडे, अनुष्का थावरी, उन्नती शेंडे, प्रतीक्षा ठाकरे, तुषार खेडेकर,संस्कृती मुपिडवार, नैना बोरकर, तेजस्वी ठाकरे, अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव चींन्ह व गौरवपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव ऍड.अनिल वैरागडे यांनी केले. संचालन. डॉ.प्रा.गणपत आगलावे यांनी केले. कार्यक्रमाला स्व.नागपुरेजी यांचे शुभचिंतक, शेतकरी बांधव, संस्थेचे संचालक, पदाधिकारी, सर्वप्राचार्य, मुख्याध्यापक,शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते. स्व. वी.तू.नागपुरे सामाजिक कार्य व सेवा प्रतिष्ठानच्या निमंत्रक प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.