Artificial jewelry training : महिलांना आर्टिफिशियल ज्वेलरीचे दहा दिवसीय मोफत प्रशिक्षण

Artificial Jewelery Training बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात जिजा फाउंडेशन व शिवसेना ठाकरे गटातर्फे महिलांसाठी विशेष आर्टिफिशियल दागिने कसे बनवायचे याबाबत मोफत दहा दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

जिजा फाउंडेशनच्या अध्यक्षा मनस्वी संदीप गिर्हे यांनी महिलांना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या बाबत बल्लारपूर शहरात 13 जुलै रोजी मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात आला.

अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात स्वच्छतेचे 2 रंग अभियान

Artificial Jewelery Training उदघाटन कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, उपजिल्हा प्रमुख, माजी नगरसेवक सिक्की यादव, जिजा फाउंडेशनच्या अध्यक्षा मनस्वी संदीप गिर्हे, शिवसेना महिला जिल्हा संघटिका कल्पना गोरगाटे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे उदघाटन झाल्यावर जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे जात आहे, मात्र अश्या संधी प्रत्येक महिलांपुढे चालून येत नाही, आपण आपल्या आतील कला गुणांना वाव देत सदर प्रशिक्षणात सहभाग घ्यावा.

जिजा फाउंडेशन अध्यक्ष मनस्वी गिर्हे म्हणाल्या की महागाई ने गृहिणींचे कंबरडे मोडले आहे, आज प्रत्येक वस्तू घेण्यासाठी सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो, मात्र महागड्या वस्तूचे निर्माण आपण करू शकतो, हे या मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश आहे, तरी या दहा दिवस (13 ते 23 जुलै पर्यंत) चालणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात आपण भाग घेत, आपला दागिना आपण स्वतः तयार करून याची विक्री सुद्धा करू शकतो.

महिला जिल्हा संघटीका कल्पनाताई गोरगाटे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन संघटिका मीनाक्षी गलगट यांनी केले.

यावेळी तालुका महिला संघटिका मीनाक्षीताई गलगट, शहर संघटिका ज्योतीताई गेहलोत, रिता बेंवंशी, नेहा मुंदडा, शारदा अक्केवार, ज्योती , बॉबी कदासी, माजी नगरसेवक रंजीता बिरे आशा माझी,पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!