Ballarpur Firing Case : व्यापारी एकटवले, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिले पोलीस विभागाला निर्देश

Ballarpur Firing Case चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात 7 जुलै रोजी मालू वस्त्र भांडार येथे 3 अज्ञात युवकांनी पेट्रोल बॉम्ब टाकत दुकान जाळण्याचा प्रयत्न करीत गोळीबार केला. या घटनेनंतर बल्लारपूर येथील व्यापाऱ्यांनी तीव्र निषेध करीत आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती.
गांधी चौकातील गजबजलेल्या परिसरात भरदिवसा हा हल्ला झाल्याने व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली, व्यापाऱ्यांनी याबाबत पत्रकार परिषदेतून आपला रोष व्यक्त केला होता.

अवश्य वाचा : जिल्ह्यातील 7 लक्ष महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ

मालू वस्त्र भांडार प्रतिष्ठानचे संचालक अभिषेक मालू व त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा देण्यात यावी व अश्या घटनांवर आळा बसावा यासाठी फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स इंडस्ट्री तर्फे पालकमंत्री मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले.

 

Ballarpur Firing Case चंद्रपूर नंतर बल्लारपूर शहरात झालेली घटना म्हणजेच शहरात दहशतीचे निर्माण करणे होय, या घटनांवर तात्काळ कायद्याचा धाक निर्माण व्हायला हवा व प्रशासनाने कठोर पाऊले उचलावी असे FTCI संघटनेचे अध्यक्ष रामकिशोर सारडा यांच्या नेतृत्वात पालकमंत्री मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आले.

महत्त्वाचे : पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरण, व्यापाऱ्यांची मागणी आरोपीना अटक करा

बल्लारपूर येथील पेट्रोल बॉम्ब घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी मालू कुटुंबियांची भेट घेतली यावेळी FTCI चे पदाधिकारी व पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन उपस्थित होते.
मालू कुटुंबियांना सुरक्षा, व बल्लारपूर वस्ती भागात पोलीस चौकी चे निर्माण व या गुन्ह्यातील आरोपीना तात्काळ अटक करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना दिले.
यावेळी संदीप माहेश्वरी, संतोष चिल्लरवार, गिरीश चांडक, पंकज शर्मा, नवीन चोरडिया, बल्लारपूर व्यापारी असोसिएशनचे नरेश मुंदडा व व्यापारी उपस्थित होते.

Ballarpur Firing Case जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, घुग्गुस, राजुरा याठिकाणी अश्या गोळीबाराच्या घटना पूर्वी सुद्धा घडलेल्या आहे, पोलिसांच्या कारवाई नंतर सुद्धा या घटनेत वाढ होत आहे, म्हणजेच गुन्हेगारांच्या मनात खाकीचा धाक संपला की काय? अशी स्थिती जाणवू लागली आहे.

 

विशेष बाब म्हणजे वर्ष 2024 मध्ये हत्येच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, अवैध शस्त्र, तलवार यावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केल्यावर सुद्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्रांचा वापर वाढत चालला आहे.

यामागे प्रमुख कारण म्हणजे गुन्हेगारी विश्वातून राजकिय क्षेत्रात गुन्हेगारांची होत असलेली एंट्री, राजकीय क्षेत्रात दबदबा निर्माण व्हावा यासाठी गुन्हेगारी वृत्तीचा वापर आज चंद्रपूर जिल्ह्यात वाढत आहे, त्यामुळे ही गुन्हेगारी जिल्ह्यात फोफावायला लागली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!