Ballarpur Shootout : बल्लारपूर शहरात गोळीबार

Ballarpur shootout 4 जुलै ला चंद्रपुरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला होता, त्यानंतर 3 दिवसांनी पुन्हा बल्लारपूर येथे गोळीबाराची घटना घडली असून यामध्ये एक जखमी झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 3 दिवसात दुसऱ्यादा गोळीबाराची घटना घडली आहे.

 

बल्लारपूर शहरातील बस स्थानक परिसरात मालू कापड दुकानासमोर अज्ञात युवकाने गोळी झाडली, त्या युवकाने लागोपाठ दोन गोळ्या झाडल्याने एक गोळी दुकानात काम करणाऱ्या नोकरांच्या पायाला लागली आहे.

अवश्य वाचा : चंद्रपुरात भरदिवसा गोळीबार

Ballarpur shootout काही दिवसांपूर्वी कापड दुकान मालक यांना लुटण्याचा प्रयत्न झाला होता, त्यानंतर आता गोळीबाराची घटना घडली आहे, विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील गोळीबाराच्या घटनेची सुरुवात बल्लारपूर शहरातून झाली होती.

महत्त्वाचे : चंद्रपूर शहरातून 14 वर्षीय मुलगा बेपत्ता

गुन्हेगारी जिल्ह्यात सतत वाढत आहे, जिल्ह्याची वाटचाल आता क्राईम कॅपिटल कडे होत आहे, जिल्ह्यात अवैध शस्त्रे येतात कुठून याचा पोलिसांना थांगपत्ता नसतो काय? असे प्रश्न उपस्थित होत आहे.

या घटनेनंतर बल्लारपूर पोलिसांवर व्यापाऱ्यांचा चांगलाच रोष वाढला असून याबाबत व्यापारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करणार आहे अशी माहिती पुढे आली आहे.

चंद्रपूर पोलीस यांनी वाढत असलेल्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!