Ballarpur Vidhan Sabha Congress चंद्रपुर काँग्रेस जिल्हाध्यक्षांना डावलून संतोष रावत यांचे कार्यकर्ते गडचिरोलीच्या काँग्रेस नेत्याला हाताशी धरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मुल बल्लारपुर विधानसभेच्या तिकिटासाठी फिल्डिंग लावत आहे. 7 जुलै 2024 रोजी मुल च्या संतोष रावत गटाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली.
अवश्य वाचा : चंद्रपूर विधानसभा लढण्यासाठी कांग्रेसला मिळाला उमेदवार
लोकसभेच्या ऐतिहासीक विजयामध्ये या विधानसभेत घेतलेल्या लक्षणीय मताधीक्या ने विधानसभेच्या तिकिटासाठी मूल बल्लारपूर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच चालू असताना संतोष रावत गटातील कार्यकर्त्यानी जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांना डावलुन गडचिरोलीच्या एका काँग्रेस नेत्याला हाताशी धरून नाना पटोले यांची भेट घेतली हा जिल्हाभरामध्ये आता चर्चेचा विषय झालेला आहे.
Ballarpur Vidhan Sabha Congress नुकत्याच झालेल्या पोंर्भुणा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पदाच्या निवडीवरून संतोष रावत गट आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्यामध्ये बराच कलगीतुरा रंगलेला आहे.
तालुका अध्यक्षाच्या निवडीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी वासुदेव पाल यांच्या नावाला उघडपणे विरोध करत पत्रकार परिषद घेउन सामुहीक राजीनामे देण्याची धमकी देत जिल्हा कांग्रेस कमेटीला जेरीस आनले होते.
या गटातटाच्या राजकारणाच्या बाबतीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधीही कडक भूमिका घेत पदाधीकारी यांना सहा वर्षा करिता निलंबित केले आहे. त्यामुळे आता ते काय भूमिका घेतात याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
सध्या तरी बल्लारपूर विधानसभा साठी कांग्रेस पक्षात डझनभर नेते इच्छुक असले तरी याबाबत पक्ष श्रेष्ठी निर्णय घेणार.
यावर कांग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक आहे, जो-तो आपल्या परीने उमेदवारी मिळावी यासाठी फिल्डिंग लावत आहे, कोण-कुणाला भेटलं याने मला काही एक फरक पडत नाही, मात्र उमेदवारांचे नाव मला द्यायचे आहे, जो खरा दावेदार आहे त्याला उमेदवारी नक्की मिळेल. उमेदवारी देण्याचा जो काही निर्णय असेल ते पक्षश्रेष्ठीं घेणार.