Bharosa cell चंद्रपूर – सध्या राज्यात अपंग, अंध, मूक-बधिर असे विविध शिक्षण संस्था सुरू करीत अनुदान लाटण्याचे प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहे. काही संस्थेत अनुचित घटना सुद्धा घडलेल्या आहे, त्यानंतर सुद्धा ना प्रशासन यावर लक्ष देत ना कुठली सामाजिक संस्था.
चंद्रपुरात सुद्धा असे अनेक प्रकार सुरू आहे, खरंच अश्या शिक्षण संस्थेत विद्यार्थी सुरक्षित आहे काय? याचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी भरोसा सेल ला शिक्षण संस्थेत पाठविले.
30 जुलै रोजी बाबूपेठ येथील मूकबधिर निवासी शाळेत भरोसा सेल च्या पोलीस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम यांनी आपल्या चमू सह भेट दिली.
अवश्य वाचा : गडचांदूर शहरातील बॉम्ब ची निर्मिती सख्ख्या भावांनी youtube बघून केली, सविस्तर वाचा
Bharosa cell यावेळी शिक्षक पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी पालक, शिक्षक व विद्यार्थी हजर होते. उपस्थित मुलांना गुड टच बॅड टच, पोक्सो कायदा, डायल 112, वाहतुकीचे नियम व धूम्रपानाचे दुष्परिणाम यावर मेश्राम यांनी मार्गदर्शन केले.
महत्वाचे : चंद्रपुरातील विद्यार्थ्यांना मिळणार पायलट प्रशिक्षण, करा अर्ज
मूकबधिर शाळेतील शिक्षकांबद्दल पालकांमध्ये नाराजी दिसून आली, शिक्षक मुलांकडे व्यवस्थित लक्ष देत नाही, वैद्यकीय मदतीचा अभाव, मुलींना शाळेत प्रवेश देत नाही, मुलांकडून शाळेतील कामे करवून घेतात, शाळा अनेकदा बंद असते, शाळेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अभाव आहे, विशेष बाब म्हणजे या शाळेत 60 विद्यार्थ्यांपैकी फक्त 2 मुली आहे, शाळेच्या हॉस्टल मध्ये सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नाही, ज्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आहे.
अश्या अनेक समस्येने सदर मूकबधिर शाळा ग्रस्त आहे, सर्व त्रुट्या तात्काळ दुरुस्त कराव्या, विद्यार्थ्यांची सुरक्षा आधी सर्वात महत्वाची आहे, शिक्षकांनी पालकांसोबत प्रेमाने वागावे, भविष्यात शाळेत अनुचित घटना घडायला नको यावर लक्ष द्या असा भरोसा पोउपनी अपेक्षा मेश्राम यांनी पालक व शिक्षकांना दिला.
महत्वाचे : पूर आला आणि तो मार्ग तिसऱ्यांदा बंद झाला
चंद्रपूर शहर असो वा जिल्हा सर्व अनुदानित शाळेची हीच अवस्था आहे, फक्त अनुदान लाटण्यासाठी या शाळा अपंग, मूकबधिर, या विद्यार्थ्यांच्या भविष्यसोबत खेळण्याचा प्रकार करीत आहे.
यावर आता प्रशासनाने सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे, सरकारच्या अनुदानाचा योग्य वापर होतोय का हे सुद्धा त्यांनी जाणून घ्यायला हवे.
मूकबधिर शाळेतील शिक्षक-पालक व विद्यार्थ्यांचे समुपदेशन अपेक्षा मेश्राम यांनी योग्य रित्या घडवून आणले.