Bsnl Internet Down मोदी सरकार केंद्रात आल्यावर त्यांनी डिजिटल इंडिया ची घोषणा केली होती, त्यानुसार प्रत्येक गावात इंटरनेट सेवांचे जाळे पसरविण्यात येतील असे सांगितले मात्र प्रत्यक्षात आजही ग्रामीण भागात इंटरनेट व्यवस्थित रित्या चालू नाही, असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात असणाऱ्या बेंबाळ या गावात बघायला मिळत आहे.
अवश्य वाचा : 2 देशी कट्टे व चाकूने युवकावर हल्ला, राजुरा शहरात घडला हत्येचा थरार
Bsnl internet down मागील 15 दिवसापासून गावातील बँक ऑफ इंडिया ची इंटरनेट सेवा बंद आहे, त्यामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, रोज नागरिक बँकेत जात रांग लावतात मात्र आज सर्व्हर डाऊन आहे, पैसे काढता येणार नाही अशी सूचना नागरिकांना मिळत आहे, पेरणीच्या हंगामात इंटरनेट मुळे बँकेतील संपूर्ण व्यवहार ठप्प पडल्याने, शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण येत आहे.
महत्त्वाचे : ऑनलाइन पीक विम्याची पावती कांग्रेस कार्यालयात जमा करा – कांग्रेसचे आवाहन
सोबतच संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सुद्धा रखडल्या गेले आहे, सदर बाब शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांना कळताच त्यांनी बँक व्यवस्थापकाशी चर्चा करीत नेमकी अडचण जाणून घेतली, Bsnl तर्फे बँकेला सेवा सुरू होणार काम सुरू असे सांगण्यात येते मात्र प्रत्यक्षात त्यांच्याकडून असे काही काम करण्यात येत नसल्याने बँक व शेतकरी यांना अडचण निर्माण होत आहे.
सदर बाब शेतकरी बांधवांच्या आर्थिक अडचणीची असल्याने संदीप गिर्हे यांनी थेट bsnl महाप्रबंधक यांचे कार्यालय गाठले, त्यांना निवेदनातून सदर बाब स्पष्ट केली असता त्यानंतर त्यांनी कार्यालयाला इंटरनेट सेवा तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले.
अवश्य वाचा : चंद्रपूर – मूल मार्गावर भीषण अपघात, प्रवासी बचावले, अनियंत्रित बस ची समोरासमोर धडक
याबाबत माहिती मिळाली नसती तर आजही बँकेतील इंटरनेट सेवा बंद राहिली असती प्रशासन शेतकऱ्यांच्या या महत्वाच्या हंगामात सुद्धा काम करू देत नाही, अशी बाब पुढे आल्यावर संदीप गिर्हे यांनी आपली तळमळ दाखवली, आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, विकास विरुटकर, इलियास शेख, सिकंदर खान, विनय धोबे, शुभम मालुसरे, सुरज घोंगे, करण वैरागडे, गिरीश कटारे, ज्ञानेश्वर लोनगाडगे सह ईतर शिवसैनिक उपस्थित होते.