Chandrapur District Crime : बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरण, पोलीस निरीक्षकाला निलंबित करा – विजय वडेट्टीवार

Chandrapur District Crime चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेली गुन्हेगारी चिंतेचा विषय बनलेली आहे, मोठ्या शहराप्रमाणे आता लहान शहरात गंभीर प्रकारच्या घटना घडत असतील तर यामागे पोलिसांचा सहभाग आहे आता गृह विभागाने अश्या गुन्हेगारी वृत्तीला ठेचून काढले पाहिजे असा मुद्दा 9 जुलै ला विधानसभा अधिवेशनात विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

 

चंद्रपूर शहरातील व्यापारी संकुल रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे भरदिवसा मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर गोळीबार करण्यात आला, सदर घटनेला 2 दिवस उलटत नाही तर बल्लारपूर शहरात पेट्रोल बॉम्ब व गोळीबार हल्ला करण्यात आला होता.

अवश्य वाचा : बल्लारपूर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची रस्सीखेच

Chandrapur District Crime या दोन्ही घटनेमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे, वर्दळीच्या ठिकाणी होत असलेल्या या गंभीर गुन्ह्याची हिंमत गुन्हेगार करतात तरी कसे? पोलीस हफ्तेखोरी मध्ये व्यस्त असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे बल्लारपूर शहरातील पेट्रोल बॉम्ब हल्ला व गोळीबार करणारा आरोपी हा कुख्यात गुंड व हद्दपारीची शिक्षा भोगत आहे, त्यानंतर हा मागील आठवड्यापासून शहरात होता, याबाबत पोलिसांना सूचना दिल्या गेल्या मात्र त्यावर काही कारवाई झाली नाही.

कारण पोलीस अश्या गुन्हेगारांना संरक्षण देत पाठीशी घालण्याचे काम करते, पोलिसांना ज्यावेळी तडीपार बाबत सूचना दिली असता त्यांनी त्याला अटक करायला हवी होती मात्र तसे काही झाले नाही, त्यामुळे भरदिवसा इतकी मोठी घटना बल्लारपूर शहरात घडली.

सविस्तर वाचा : चंद्रपूर विधानसभा निवडणुकीसाठी कांग्रेसला मिळाला उमेदवार

Chandrapur District Crime त्यामुळे बल्लारपूर पोलीस निरीक्षकाला निलंबित करावे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली आहे, या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, याची जबाबदारी कोण घेणार?

पोलीस कारवाई करणार की गुन्हेगारांना पाठीशी घालणार हा मोठा प्रश्न आहे, विदर्भातील गृहमंत्री असल्यावर सुद्धा विदर्भात असे गंभीर गुन्हे घडत आहे, त्यांनी तात्काळ दोषी पोलिसांवर कारवाई करायला हवी अशी मागणी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

जिल्ह्यातील या वाढत्या गुन्हेगारीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, गृहमंत्री फडणवीस यांनी या विषयांवर लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली असून लवकरचं याबाबत गृहमंत्री फडणवीस यांची भेट घेत चर्चा करणार असल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगितले आहे.

बल्लारपूर शहरातील मालू वस्त्र भांडार संचालक मालू कुटुंबियांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी व्यापारी मंडळाने केली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!