Chandrapur district तळोधी बा :-ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या नागभीड व तळोधी या दोन्ही वनपरिक्षेत्रातील दोन लोकांना दोन दिवसांत मारणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात तळोदी विभागाला यश आले आहे.
Chandrapur district नागभीड वनपरिक्षेत्रातील दोडकू शेंदरे या इसमास व तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील देवपायली बिटातील जनाबाई बागडे या महिलेला ठार मारणाऱ्या वाघाला सापळा रचून पकडण्यात आले.
यावेळी याकरिता मुख्य वन संरक्षक रामगावकर यांनी परवानगी देत या वाघाला पकडण्याचे आदेश केले होते. त्यानंतर तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार यांच्या मार्गदर्शनात घटनास्थळाच्या काही अंतरावरच या वाघाला बेशुद्ध करून पकडण्यात आले.
अवश्य वाचा : मुसळधार पाऊस आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी
यावेळी डॉक्टर रमाकांत खोब्रागडे, शुटर अजय मराठे यांनी या वाघाला बेशुद्ध केले. यावेळी तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वनकर्मचारी, चिमूर येथील गस्तीपथक व स्वाब संस्थेचे बचाव पथकाचे यश कायरकर , जिवेश सयाम व इतर संपूर्ण सदस्य उपस्थित होते.
या वाघाला पकडण्याच्या कारवाईनंतर परिसरातील लोकांनी वनविभागाचे कौतुक करत सुटकेचा निःश्वास सोडला.
पाऊस सुरू झाल्याने शेतकरी आता पेरण्या करायला शेतात जाऊ लागले, याच दरम्यान वाघाला शिकार करणे सोपे होत व शेता नजीक दबा धरून वाघ शिकारीची वाट बघत असतो, शेत मजूर व शेतकरी अश्या वेळी या घटनेत बळी पडतात, ताडोबा अभयारण्य व बाहेरील भागात वाघांची संख्या जास्त असल्याने एक वाघ जरी वनविभागाच्या जाळ्यात अडकला तर दुसरा वाघ त्या क्षेत्रात येऊ शकतो याकरिता नागरिकांनी खबरदारी बाळगायला हवी.