Chandrapur Gambler : इमर्जन्सी लाईटच्या उजेडात राजकीय पदाधिकारी व सट्टा व्यावसायिकाचा जुगार

Chandrapur gambler चंद्रपूर जिल्ह्यात पुराने हाहाकार माजविला असून अनेक कुटुंबांना याचा तडाखा बसला आहे, प्रशासन सध्या नागरिकांच्या मदतकार्यात गुंतलेले आहे, या बाबीचा फायदा घेत चंद्रपूर जिल्ह्यात जुगार बहाद्दर सक्रिय झाले आहे, नुकताच दुर्गापूर पोलिसांनी माजी नगरसेवकसहित चौघांना ताब्यात घेतले होते, मात्र आता तर राजकीय पदाधिकारी व सट्टा क्षेत्रातील अग्रेसर नाव असलेल्या व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे.

अवश्य वाचा : तृतीयपंथीयांसाठी सरकारने योजना राबवावी – राहुल बालमवार मनसे

जिल्ह्यातील अधिकृत व अनधिकृत जुगार खेळण्यासाठी राजुरा शहराचे नाव पुढे आहे, विशेष म्हणजे या भागात जुगार खेळण्यासाठी वणी, तेलंगणा येथील जुगार खेळाडू सहज पोहचतात.
Chandrapur gambler अश्यात 22 जुलैला रात्रीच्या सुमारास माणिकगड रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेच्या पडीत क्वार्टर च्या भिंतीला लागून काही इसम हे इमर्जन्सी लाईटच्या उजेडात जुगार खेळत होते अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.
माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अचानक धाड मारली असता त्याठिकाणी काही इसमानी तिथून पळ काढला तर चौघे पोलिसांच्या तावडीत मिळाले.
52 पत्त्यावर सदर ताब्यात घेतलेले इसम हे कट पत्ता खेळत होते, यामध्ये वणी येथील हाफिज रहमान खलील रहमान, 48 वर्षीय नरेश शामसुंदर मुंधळा रा.बालाजी वार्ड बल्लारशाह, 42 वर्षीय मतीन माबिन कुरेशी रा.गांधी चौक, राजुरा व सैफउद्दीन शाह रा.राजुरा यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी यावेळी दुचाकी वाहन mh34 bu 7956, mh34 bj 0238, mh34 bx 2971, mh34 cb 3494, mh34 bp 0597, mh34 cc 7296 व नंबर नसलेली दुचाकी, 3 मोबाईल रोख रक्कम 2 लाख 33 हजार 800 रुपये असा एकूण 6 लाख 80 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, त्यानंतर आरोपी व जप्त मुद्देमाल राजुरा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!