chandrapur heavy rain : चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा प्रकोप, दोघेजण गेले वाहून

Chandrapur heavy rain चंद्रपूर – मागील 2 दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे, सतत सुरू असलेल्या पावसाने ग्रामीण व शहरी जीवन विस्कळीत केले आहे, नागभीड तालुक्यात दोघेजण पुरात वाहून गेले यामध्ये एकाचा मृतदेह प्रशासनाला मिळाला आहे.

20 जुलैला सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती, जिल्ह्यातील सर्वात मोठे इरई धरण धोक्याची पातळी गाठत असता प्रशासनाने धरणाचे 3 दरवाजे 0.25 मीटर ने सुरू केले, पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रशासनाने नदी पात्र जवळील गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता.

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात 7 हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचीत

ग्रामीण भागातील वरोरा, भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा, शेगाव व चिमूर मार्ग पूर्णतः बंद पडला, इरई नदीचे पाणी मोठया प्रमाणात वाहत असल्याने अर्जुनी तुकुम, वायगाव, कोकेवाडा, आष्टा गावात काही प्रमाणात पाणी शिरले, कोरपना तालुक्यातील गाडेगाव, नारंडा व आवळापुर-नारंडा मार्ग पावसाने ठप्प पडला.


Chandrapur heavy rain ब्रह्मपुरी येथे अतिवृष्टी झाल्याने शहरातील देलनवाडी भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले.
बामणी पुलावर पाणी चढल्याने नागभीड-नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प पडली, भिसी-चिमूर येथे पिंपलनेरी नदीला पूर आला, या मार्गावरील पुल पाण्यात बुडाला असून प्रशासनाने वाहनांना वाहतुकीसाठी दुसरा पर्याय सुचवीत वाहतूक सुरू केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे विलम नाल्यात 12 वर्षीय मुलगा गेला वाहून

नागभीड तालुक्यात विलम नाल्यात दोघे वाहून गेले..
नागभीड तालुक्यात दोन व्यक्ती पुरात वाहून गेले. त्यातील एकाचा मृतदेह हाती लागला तर दुसऱ्याची शोधमोहीम सुरू आहे. उल्लेखनीय बाब अशी की, या दोन घटना वेगवेगळ्या गावातील असल्या तरी एकाच नाल्यावरील आहेत.
पहिली घटना विलम येथे घडली. विलम येथील ॠणाल प्रमोद बावणे (११) हा मुलगा सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास गावातील इतर मुलांसोबत गावाजवळच्या विलम नाल्यावर पूर बघण्यासाठी गेला होता. तेव्हा या नाल्यावर वर्दळ सुरू असल्याने हा मुलगाही नाला पार करीत असताना पाण्यात त्याचा पाय घसरला आणि पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला. आजुबाजूला असलेल्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल झाला.


दुसऱ्या घटनेत बोथली येथील स्वप्नील हेमराज दोनोडे (३०) हा तरुणही गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर पूर बघण्यासाठीच गेला होता. त्याचाही पाय घसरला आणि वाहून गेला. मात्र काही अंतरावर चिखल असल्याने तो चिखलात फसला. उपस्थित नागरिकांनी हालचाल करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तोवर त्याचा मृत्यू झाला होता.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!