Chandrapur News : लायटर वरून पतीने पत्नीवर केला प्राणघातक हल्ला

Chandrapur News 30 जून ला क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीवर सत्तूर ने वार करीत प्राणघातक हल्ला केला, सुदैवाने या हल्ल्यात पत्नी बचावली, पोलिसांनी या प्रकरणी कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीचा शोध सुरू आहे.

अवश्य वाचा : प्रेयसीची हत्या करण्यासाठी प्रियकराने ऑनलाइन मागविला चाकू

बाबूपेठ नेताजी चौक येथे राहणारे पेंदोर या दाम्पत्यामध्ये क्षुल्लक कारणावरून नेहमी वाद व्हायचे, जी प्रत्येक घरातली गोष्ट आहे. चंद्रपूर जिल्ह्यात यापूर्वी 6 ते 7 हत्येच्या प्रकरणात पती-पत्नीमधील क्षुल्लक वाद होता हे विशेष.

 

Chandrapur News 30 जून रोजी शशिकांत विठ्ठल पेंदोर व त्याची पत्नी 32 वर्षीय शुभांगी पेंदोर ह्या घरी होत्या, त्यावेळी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास शशिकांत यांचा मुलगा मित्राच्या बर्थडे पार्टीतून परत आला, कपडे बदलवित असताना मुलाच्या खिशातून लायटर बाहेर पडला.

 

यावरून थोडी कुजबूज झाली, काही वेळात मुलगा मित्रांसोबत बाहेर गेला असता घरी शशिकांत याने पत्नी सोबत वाद सुरू केला, तुझा मुलगा नशा करतो, तुझं मुलावर लक्ष नाही म्हणत वाद सुरू केला.

 

रात्री 10.30 वाजता शुभांगी ने मुलाला कॉल केला व घरी तुझ्यावरून वाद सुरू आहे असे म्हणत त्याला घरी बोलाविले.
मुलगा घरी आला तेव्हा शशिकांत चा राग अनावर झाला होता, त्याने मागेपुढे न बघता घरात असलेल्या सत्तुर ने बायकोवर हल्ला केला, सत्तूर हा शुभांगी च्या जबड्याला लागल्याने तिला गंभीर दुखापत झाली, शशिकांत इतक्यावरच थांबला नाही त्याने पुन्हा शुभांगी वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र शुभांगी व तिचा मुलगा जीव वाचविण्यासाठी घराबाहेर पळाले.

महत्त्वाचे : चंद्रपूर मनपा पोहचली नवशक्ती विरोधात पोलीस ठाण्यात

Chandrapur News नेताजी चौकात असलेले ब्रदर हेअर सलून येथे काही मुले बसलेली होती, त्यावेळी रस्त्यावरून शुभांगी वाचवा वाचवा अशी ओरडत होती, तिच्या मागे शशिकांत हा सत्तूर घेऊन धावत होता, बसलेल्या मुलांनी आपली एकजूट दाखवीत शशिकांत ला हाकलून लावले.

त्या मुलांनी शुभांगी ला तात्काळ रुग्णालयात नेत शहर पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
पोलिसांनी तात्काळ बाबूपेठ येथे पोहचत चौकशी करीत शशिकांत चा शोध घेतला मात्र तो पळून गेल्याने पोलिसांना मिळाला नाही.
सहायक पोलिस उपनिरीक्षक मंगेश भोंगाळे सध्या हे प्रकरण हाताळत आहे.
पोलिसांनी आरोपी शशिकांत पेंदोर वर कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला असून त्याचा पोलीस शोध घेत आहे.

 

विशेष म्हणजे बाबूपेठ परिसरात शहर पोलिसांच्या वतीने नियमित पेट्रोलिंग केल्या जाते, त्यामुळे सध्या ह्या भागात अवैध हालचाली होताना दिसत नाही.
सदर प्रकरणाचा तपास शहर पोलीस करीत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!