Chandrapur news गुरू गुरनुले मूल – गेल्या तीन दिवस सुरु बसलेल्या सततधार पाऊसामुळे मूल शहरामधील बराचसा भाग मुसळधार पावसाने पाण्याखाली येऊंन, पूरसदृश परिस्थिती तयार होऊन शहरातील जवळपास अनेक घरांमध्ये पाणी घुसले व मोठे नुकसान शहरवासियांना
सहन करावे लागत आहे. मूल शहरातील जनतेला व विशेषता वॉर्ड क्रमांक १५,१६,१७ मधील नगरवासियांना दरवर्षीच्या पावसात असा सामना करण्याची वेळच येत असल्याने प्रशासन विरोधात रोष व्यक्त केल्या जात आहे.
अवश्य वाचा : मामा तलाव फुटला, चीचपल्ली गावात पाणीचं पाणी
Chandrapur news याबाबत वॉर्डातील नागरिकांनी न.प. व बांधकाम विभागाला सूचना केल्या परंतु याबाबत प्रशासनाने पाण्याचा निचरा होण्यासाठी काहीही नियोजन केलेले नाही. दुर्गा मंदिर परिसरातील तलावाच्या मागील भागात डी.पी.रोड लगत वास्तव्यात असणारे वॉर्ड नंबर १६ मधील रवींद्र उराडे, वर्षा रामटेके, रायपुरे, ललिता मेश्राम, शुभम अवतरे, काजल दुधे,सीमा भसारकर, तर दुर्गा मंदिर समोरील भागात राहणारे प्रफुल म्याकलवार, अमित मंकिवार, रामदास गुरनुले,बंडू चौधरी, अनिल कोठारे,सोनू नान्हे,प्रकाश भोयर, लक्ष्मण क्षिर्गिर्वार यांच्या घरात पाणी घुसल्याने घरातील सामान ओले झाले,नासधूस झाली. घरातील पाणी बाल्ट्याने झोकून देण्याची पाळी आली.
मूल शहरातील महामार्गाचे कडेने जाणाऱ्या गटरलाईनचे दोषपूर्ण काम व वनविभागाने आपल्या सोईकरीता
शहरात घुसविलेला पाण्याचा लोंढा यामुळे गेल्या सात वर्षोनंतर जिवघेणी स्थिती शहरात निर्माण झाली.
हे विशेष. ग्रीनसिटी म्हणून सनकल्पनेत असलेल्या मूल शहराला पाण्यावर तरंगणारे शहर म्हटले तर वावगे होणार नाही. तत्कालीन न.प मुख्याधिकारी व बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता या अधिकाऱ्यांना ही परिस्थिती प्रत्यक्ष दाखविण्यात आली होती. नगर वडियांची भावना व निकड लक्षात घेऊन,अनेक तांत्रीक बाबींचा अभ्यास करुन बांधकाम केल्यास येणाऱ्या परिस्थितीवर मात केल्या जाऊ शकते असे सुचविण्यात आले होते परंतु अशा गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. अंतर्गत नाल्या,गटारे, साप केल्या गेल्या नाही, कामाचा पत्ताच नाही.
मुल शहरातून जाणाऱ्या महामार्गावर तिन ते चार ठिकाणी महामार्ग फोडून मोठया व्यासाचे पाईप टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु तेही काम केल्या गेले नाही म्हणून ही परिस्थिती नागरिकांवर आली असल्याचे नागरिक बोलून दाखवीत होते.
मागील तीन वर्षापूर्वी शहरातील वॉर्ड न.१५,१६,१७ मध्ये मुसळधार पावसातही कधी घरांमध्ये पाणी घुसले
होते.
अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. न.प. व बांधकाम विभागाने पाण्याचा निचरा होणारी आऊट लाईन केली नाही व पाण्याचा लोंढा सारखा क्षमतेपेक्षा अधिक वाहणारे पाणी दोनदा अनेक घरांमध्ये घुसले आहे.ही परिस्थिती शासनाने व प्रशासनाने त्वरित सुधारावे यासाठी काही उपाय योजना कराव्या आणि नागरिकांच्या घरात पाणी घुसले याचीही नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी मागणी सी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी केली आहे.