Chandrapur news : मूल शहरात शिवसेनेच्या कार्यक्रमात उसळला महिलांचा जनसागर

Chandrapur news मूल येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा सन्मान स्त्री कर्तुत्वाचा कार्यक्रम सोहळा भाग्यरेखा सभागृह मुल येथे 14 जुलैला मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

महत्त्वाचे : आर्टिफिशियल ज्वेलरी चे मोफत प्रशिक्षण


या कार्यक्रमाचे आयोजक सौ. मनस्वीताई संदिप गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ महिला सौ.चारूशिला नथूजी आरेकर, सौ.अनिता बट्टे मॅडम, रानिताई अवजे, माजी नगरसेविका न.पं.मुल सौ.रिणाताई महेश हरडे, सौ.रिणाताई ठाकरे, शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार व आदी मान्यवर होते.
तर कार्यक्रमात उत्कृष्ट शिक्षिका तथा मुख्याध्यापिका म्हणून आदरणीय सौ. सुनिता बुटे मॅडम यांचा सत्कार जिजा फोडेशनचे अध्यक्षा सौ. मनस्वीताई संदीप गिऱ्हे,यांनी शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार केले.

Chandrapur news या कार्यक्रमात विविध खेळ घेण्यात आले संगीत खुर्ची,लिंबू चमचा, पोत्या वरील उड्या,दोन पाय उडी, उखाने स्पर्धा व आदी खेळ घेण्यात आले.या मद्ये विविध स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीया विजेत्यांना मानाची पैठणी, नवारी साडी, इरकणी पैठणी व सन्माचिन्ह देऊन पारितोषिके देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येत महिलांची उपस्थिती होती.

अवश्य वाचा : अखेर त्या सांबरचा मृत्यू

कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना महिला आघाडीचे सौ सोनियाताई डोरलीकर,सौ.मीनाताई शंभरकर,
सौ.टिनाताई ठाकरे,राधाताई वर्मा,सौ. मीनाक्षीताई गट्टूवार,सौ. सारिकाताई डांगे,सौ. भावना डोरलिकर, सौ.मिरा नरूले, सौ.मैथिली हेडाऊ,सौ.पायल देऊळवार,सौ.सोनूताई मोरे व आदी मुल,महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!