chandrapur police : चंद्रपूर पोलीस दलात खळबळ उडाली आणि….

Chandrapur police बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. अजय पांडुरंग मोहूर्ले वय ४० असे पोलीस शिपाई चे नाव आहे.
बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे वाहतूक विभागात कार्यरत पोलीस शिपाई अजय पांडुरंग मोहुर्ले हा वस्ती विभागातील पोलीस क्वार्टर मध्ये राहत होते. त्यांना दारूचे व्यसन असल्यामुळे पत्नी सोबत वाद होत होता. मागील पाच-सहा दिवसांपासून त्याची पत्नी आपल्या नातेवाईकाकडे गेली असता त्यांनी आपल्या राहत्या क्वार्टर मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

अवश्य वाचा : शेतकऱ्यांसाठी सरसावले शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे, पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष येनगंधेवार, पोशी खंडेराव माने करत आहे.


मृतक अजय मोहुर्ले याला एक सात वर्षाचा मुलगा आहे. पोलीस शिपाही अजय यांनी अगोदर सुद्धा आत्महत्या करण्याचे प्रयत्न केल्याची चर्चा होत आहे.
विशेष बाब म्हणजे 2 दिवसांपूर्वी वरोरा पोलीस स्टेशनमधील पोलीस शिपायाने कामाच्या तनावपायी आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!