Chandrapur news चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेट येथे राहणारा 14 वर्षीय प्रियांशु बंडू देठे हा मुलगा 29 जून रोजी न सांगता घरून निघून गेला, प्रियांशु ची आई-वडिलांनी 3 दिवस वाट बघितली मात्र तो आला नाही.
महत्त्वाचे: रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये पुन्हा गोळीबार, चंद्रपूर हादरले
नातेवाईक, मुलाचे मित्र यांच्याकडे विचारणा केली मात्र प्रियांशु चा शोध लागला नाही, तसेच रेल्वे स्टेशन, बस स्टॉप याठिकाणी सुद्धा शोध घेतला मात्र तो कुठेही आढळून आला नाही, प्रियांशु ची आई विशाखा देठे यांनी याबाबत शहर पोलिसात तक्रार दिली की त्यांच्या मुलाला कुणीतरी फुस लावून पळविले आहे.
पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे, परंतु अद्यापही प्रियांशु चा पत्ता लागला नाही.
Chandrapur news प्रियांशु चे वर्णन – उंची 4 फूट 5 इंच, सडपातळ बांधा, वर्ण सावळा, केस काळे, दोन्ही ओठावर पांढरे डाग, मराठी हिंदी भाषा बोलता येते, अंगात हाफ पॅन्ट निळ्या रंगाचा बरमुडा, गोल गळ्याचा हाफ टी-शर्ट, आकाशी रंगांची पायात साधी चप्पल.
अवश्य वाचा : औषध विक्रेत्याने नैराश्यातून केली आत्महत्या
चंद्रपूर शहर पोलिसांनी याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे की सदर वर्णनाचा मुलगा कुणालाही आढळल्यास पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके – 9767103829 व पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर 9527347443 वर सम्पर्क करावे.