Chandrapur Police : चंद्रपुरात पुन्हा आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह, मृतकाच्या हातावर आहे हे नाव

Chandrapur Police चंद्रपुरात अनोळखी इसमाचे मृतदेह मिळण्याचे प्रमाण वाढले आहे, मृतदेह मिळाल्यावर त्याची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. मात्र कर्तव्याची जाणं असलेले पोलीस सदर मृतदेह कुटुंबियांच्या हवाली नक्की करतात.

अवश्य वाचा : अशी आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना

9 जुलै ला शहरातील महाकाली मंदिर परिसरातील मैदानात अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलीस त्याठिकाणी दाखल झाले, मृतक हा वय 55 ते 60 वर्षे वयाचा असल्याचा अंदाज आहे.

 

मृतदेहाचे वर्णन

अंदाजे 55 ते 60 वर्ष, वयाचा, काळा सावळा रंगाचा, उंची 5 फूट 6 इंच, डोक्यावर केस कापलेले टक्कल, दाढी मिशी पांढरी कापलेली, अंगात हिरव्या रंगाचा काळया रेघाटीचा चौकड्याचा फुल शर्ट घातलेला ,तसेच गुलाबी रंगाची गोल रंगाची गळ्याची टी-शर्ट ,व काळया रंगाचा जीन्स पॅन्ट घातलेला, बांधा सडपातळ तसेच त्याचे उजवे हातावर मंसाराम नेताम केडरी असे नाव गोंदलेले आहे.

अवश्य वाचा : त्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आता शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे कडे

Chandrapur Police सदर अनोळखी इसम पुरूष याचे बाबत माहिती घेतली असता तो अंदाजे चार ते पाच दिवसापासून महाकाली मंदिर परिसरात फिरत असून आजारी होता व त्यास बरोबर बोलता चालता येत नव्हते, तरी सदर अनोळखी इसम याचे बाबत माहिती व ओळखत असल्यास PSI विजय मुके मो.न. 9923401065 पो. स्टे .चंद्रपूर शहर यांना कळवावे ही विनंती व आवाहन चंद्रपूर शहर पोलिसांनी केले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!