Chandrapur railway police 3 जुलै ला पहाटे 5 वाजताच्या सुमारास मालगाडी पुढे 4 म्हैस आल्याने त्यांचा मृत्यू झाला इतकेच नाही तर काही म्हैस रेल्वे इंजिन मध्ये फसल्याने मालगाडी ही तब्बल 1 तास उशिरा गेली. त्यानंतर नागपूर रेल्वे पोलीस विभागाने रेल्वे रुळाजवळ पालतु जनावरांना चरायला आणणाऱ्या गुराखी व मालक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.
महत्त्वाचे : माझी लाडकी बहीण योजनेच्या नावावर पैसे उकळले तर सेतू केंद्र कायम रद्द करणार
त्या अनुषंगाने चंद्रपूर रेल्वे पोलीस निरीक्षक के.एन. रॉय यांच्या निर्देशावरून याविरुद्ध कारवाई अभियान मोहीम राबविण्यात आली, ASI सचिन नागपूरे व ASI एन. पी.वासनिक सदर प्रकरणाचा तपास करीत गुराखी इलियास खान पठाण रा.पडोली व जनावर मालक घुटकाला तलाव निवासी नसिरुद्दीन काजी यांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध रेल्वे अधिनियम कलम 154, 174 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
Chandrapur railway police सध्या स्थितीत नागपूर मंडळातील चंद्रपूर ते हिंगणघाट, घुग्गुस, वणी एरिया मार्गावरील रेल्वे पटरी जवळ जनावरांना चारण्यासाठी आलेल्या गुराख्यांवर आता कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे, त्याकरिता कुणीही रेल्वे पटरी जवळ जनावरांना चरायला घेऊन जाऊ नये असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.
Female feticide act : चंद्रपूर मनपा देणार 1 लाख व 25 हजारांचे बक्षिस, करावे लागणारं हे काम
वरीष्ठ अधिकारी रेल्वे पोलीस मनोज कुमार यांच्या आदेशावर पोलीस निरीक्षक यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहे, यानंतर सूचनांचे पालन न झाल्यास गुराखी व मालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा रेल्वे पोलिसांनी दिला आहे.