Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यात मागील 4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे, जिल्ह्यातील अनेक धबधब्याजवळ काही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने पर्यटकांना प्रवेश नाकारला आहे.
अवश्य वाचा : वाढदिवस नको, सेवा करा, सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय
मात्र चंद्रपूर शहरात काही अतिउत्साही युवकांनी स्टंट केला मात्र तो स्टंट जीवावर बेतता बेतता राहिला मात्र स्टंट त्या युवकांना महागात पडला. 28 जुलैला सायंकाळी 4.30 वाजता चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी मार्गावरील स्मशानभूमीसमोर असलेल्या पुलावरून झरपट नदीचे पाणी वाहत असल्याने 2 युवकांनी त्या पुलावरून चारचाकी वाहन नेले, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वाहन चालकांचा अंदाज चुकला आणि वाहन सरळ पाण्यात कोसळले.
अवश्य वाचा : चीचपल्ली व पिंपळखुट गावात शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांची मदत
Chandrapur सुदैवाने वाहनात असलेल्या दोघांचा जीव वाचला मात्र वाहन पाण्यात वाहून गेले. यामध्ये बॉबी पडाल व त्याचा सहकारी अभिजित बागलवार त्या वाहनात होते. सध्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वाहनाचा शोध लागला नाही. घटनेचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहे.
अन्यथा मोठा अनर्थ घडला असता..
पोलीस विभागाने आधीच नागरिकांना पुलावरून पाणी वाहत असताना जाऊ नये असे आवाहन केले मात्र पोलिसांच्या आवाहनाला दोन्ही युवक जुमानले नाही, विशेष म्हणजे सदर वाहन काही अंतरावर गेल्याने दोन्ही युवकांनी वाहनातून उडी मारली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, पावसाच्या संततधार मुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे, कुणीही असा स्टंट करू नका असे आवाहन प्रशासनाने केले आहे.