Chandrapur van vibhag चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हाला चारही बाजूने जंगलाने वेढले आहे. घनदाट असलेल्या या वनात विविध जातींच्या वन्यजीवांचा मोठा अधिवास आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला मोठ्या संख्येने देश-विदेश्यातील पर्यटक भेट देत असतात. यातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असते. ही सकारात्मक बाजू नेहमी माध्यमातून मांडली जाते.मात्र याची दुसरी बाजू फारच विदारक आहे. जिल्हातील मानव-वन्यजीव संघर्ष टोकावर पोहचला आहे.
अवश्य वाचा : 10 वर्षांपासून केंद्र सरकार संविधानाची हत्या होत आहे – प्रतिभा धानोरकर
जंगलातील वन्यजीव आता थेट शेतात,गावात पोहचत आहेत.वन्यजीवांचा हैदोसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील बहुतांश शेती जंगलालगत आहे. जंगलातील रानडूक्करे थेट शेतात येऊन शेत पिकांची नासधुस करीत असतात. यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असतो. सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी गोंडपिपरी तालुक्यात जनसंवाद, जनसंपर्क यात्रा केली.
Chandrapur van vibhag या यात्रे दरम्यान हजारो शेतकऱ्यांनी रानडुकरामुळे होणाऱ्या नुकसानीचा पाडा वाचला. रानडुकरांच्या हल्ल्यात काही शेतकरी आणि नागरिकांचा जीव गेलेला आहे.वन विभागातर्फे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जणवन योजने अंतर्गत झटका मशीन दिली. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्या शेतकऱ्यांना वन्यजीवांनी शेताचे कितीही नुकसान केलं तरी तीन वर्ष कुठलाच मोबदला मिळणार नाही, अशी अट आहे.
वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी या योजनेत सुद्धा सेटिंग केली. झटका मशीन विकणाऱ्या दुकानदारांकडून अतिशय दर्जाहीन वस्तू दिल्या गेल्या. या झटका मशीन वन्यजीवांना रोखण्यात अपयशी ठरल्या आहेत. दुसरीकडे शेत पिकांचे मोठे नुकसान होत आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी फसवेगिरीची ठरली. यातून झटका मशीन विक्रेते आणि त्यांच्यासोबत सेटिंग केलेले वन कर्मचारी मात्र आर्थिक दृष्ट्या संपन्न झालेत, अशी तक्रार हजारो शेतकऱ्यांनी फुसे यांच्याजवळ केली.
Chandrapur van vibhag या योजनेची निवृत्त न्यायाधीशा मार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भूषण फुसे यांनी केली आहे. या सर्व मागण्यांना घेऊन 24 जुलैला भूषण फुसे धाबा वन विभाग कार्यावर धडक मोर्चा नेणार आहेत. या मोर्चात तालुक्यातील वीस हजार शेतकरी सहभाग होतील असे फुसे यांनी सांगितले आहे.