Chandrapur Zp Education : चंद्रपुरात शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन

Chandrapur zp education चंद्रपूर – आज दिनांक 5 जुलै 2024 रोजी नवेगाव मोरे आणि विसापूरच्या जिल्हा परिषद शाळेचे शेकडो विद्यार्थी निदर्शने करण्यासाठी पालकांसहित आणि गावकऱ्यांसहित जिल्हा परिषद येथे धडकले. गेल्या कित्येक दिवसापासून आमच्या शाळेमध्ये 6 वर्ग आणि १८७ विद्यार्थी असताना सुद्धा फक्त 2 शिक्षक आणि एक मुख्याध्यापक यांच्या भरवशावर ही शाळा सोडलेली आहे. प्रत्येक वर्गासाठी शिक्षक द्या, गेले कित्येक वर्ष आमच्या जिल्हा परिषद च्या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सातत्याने सुरू आहे अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी यावेळी दिली.

 

पोम्भूर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे येथील जिल्हा परिषद हायस्कूल व बल्लारपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व पालकांनी प्रशासनविरोधात रोष व्यक्त केला.

अवश्य वाचा : श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कारासाठी प्रवेशिका आमंत्रित

Chandrapur zp education नवेगाव मोरे येथील जिल्हा परिषद शाळा दोन शिक्षकांच्या भरवशावर असून वर्ग 5 वि ते दहावी कसे काय चालू शकतात आणि या सात वर्गाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कसा होऊ शकतो अशा खोचक प्रश्न यावेळी विद्यार्थी पालक आणि गावकऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना केला.

महत्त्वाचे : चंद्रपुरात प्रतिबंधित 15 किलो खर्रा प्लॅस्टिक जप्त

कित्येकदा विनंती करून विनवण्या करून निवेदन देऊनही शाळेला शिक्षक मिळत नाही आहेत आणि असलेल्या शिक्षकांची नियुक्ती सुद्धा प्रतिनियुक्तीवर दुसऱ्या गावच्या शाळेमध्ये करण्यात आली आणि त्यामुळे शाळा सुरू होऊन सुद्धा योग्य प्रकारचे शिक्षण भेटत नाहीये अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली.

 

Chandrapur zp education आज चिमुकल्या विद्यार्थ्यांवर स्वतः आंदोलन करून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याची वेळ आली हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे आणि शिक्षणाची गंगा प्रत्येक खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवायचं सोडून नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून सर्व शाळांचे कंत्राटीकरण वीस पटसंख्या खाली असलेल्या शाळा बंद करण्याचे धोरण आणि समूह शाळा बनवून खेड्यापाड्यातील शाळा बंद करण्याचे धोरण या शिक्षण विरोधी सरकारने अवलंबलेला आहे असा आरोप मोर्चेकरांनी केला.

अवश्य वाचा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विष शोध यंत्रणा उपलब्ध नाही

नवेगाव मोरे येथील जिल्हा परिषद हायस्कूल मधील एक शिक्षक ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त होत आहे, त्यानंतर शाळेत केवळ एकच शिक्षक असणार ही बाब विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या समक्ष ठेवली, मात्र शासनाने शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या नसल्याने जॉन्सन त्यांच्या प्रश्नावर निरुत्तरीत राहिले.

 

Chandrapur zp education आठवडाभरात शिक्षकांची शाळेवर नियुक्ती करू असावं आश्वासन मिळाल्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले, अशी परिस्थिती विसापूर येथील शाळेची आहे त्याठिकाणी 200 विद्यार्थी आणि शिक्षक केवळ 2, पालकांनी याबाबत उपमुख्यकार्यकारी अधिकारी वाखर्डे व शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांना जाब विचारला मात्र शिक्षणाधिकारी सोनवणे यांनी पालकांसमोर पळवाट काढत निघून गेल्या.

 

यावेळी शिक्षण बचाव आंदोलनाच्या डॉ अभिलाषा गावतुरे, ग्रामपंचायत नवेगाव मोरे चे सरपंच जगदीश शेमले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुसुमाकर येंगुले, उपसरपंच रेखा मोरे,उपसरपंच रेखा दत्तू मोरे माजी सरपंच प्रतिमा बोरकर सदस्य देवेंद्र कष्टी, हर्ष आनंद दुर्गे अमोल लोहे, बंडू अर्जुनकार कमलाकर झाडे ,प्रवीण झाडे ,संजय झगडकर आशिष कावटवार उपस्थित होते.

विसापूरच्या जिल्हा परिषद शाळेचे शेकडो विद्यार्थी देखील आपल्या पालकांसोबत आणि नागरिकांसोबत जिल्हा परिषदेत हजर होते विसापूर मधील प्रदीप गेडाम, मनस्वी गिर्हे वर्षाताई कुडमेथे, सरपंच संकेश्वर मेश्राम उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.

 

शिक्षण हे मूलभूत संवैधानिक अधिकार असताना रास्त मागण्या चे गांभीर्य पाहता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी दखल घेत पूर्ण करण्याचा आश्वासन दिले.
शिक्षण हक्क अधिनियम 2009 लागू असताना शासन व प्रशासन त्याची पूर्तता करताना दिसत नाही. जर येत्या सोमवार पर्यंत या विद्यार्थ्यांच्या मागन्या मान्य झाल्या नाही तर आम्ही तीव्र आंदोलनाची भूमिका घेऊ असा इशारा डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी दिला.

Sharing Is Caring:

1 thought on “Chandrapur Zp Education : चंद्रपुरात शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन”

  1. डाँ. अभिलाषा गावतुरे /बेहेरे यांनी सर्वसामान्य नागरिकांची मुले शिक्षण घेऊन स्वतः ची समाजाची प्रगती करु शकतात हे जिल्ह्यातील प्रत्येक गाव मध्ये जाऊन गाव तिथे वाचनालय, शिक्षणाचे महत्व, करियर मार्गदर्शन अश्या विषयाला घेऊन विधार्थी आणि पालकांचे मार्गदर्शन करणे आणि सरकार ला शिक्षणबचाव , नौकरीबचाव साठी वारंवार निवेदन देऊन शासन दरबारीं मागणी करत असतात

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!