Chandrapur Assembly Constituency : चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून कांग्रेसच्या अश्विनी खोब्रागडे यांची दावेदारी

Chandrapur Assembly Constituency लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या चुरशीला सुरुवात होत आहे, सध्या सर्व पक्षाने विविध विधानसभा क्षेत्रात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.

कांग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात सुद्धा केली असून चंद्रपुरात आतापर्यंत काही इच्छुकांनी पक्ष अध्यक्ष यांच्याकडे अर्ज भरले आहे. वर्ष 2019 मध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार म्हणून किशोर जोरगेवार यांनी मोठं मताधिक्य घेत भाजपच्या उमेदवाराला धूळ चाटविली होती, त्या निवडणुकीत कांग्रेसच्या उमेदवारांची अनामत रक्कम सुद्धा जप्त झाली होती.

अवश्य वाचा : 18 जुलैपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

Chandrapur Assembly Constituency 2 महिन्यानंतर विधानसभा निवडणुकीचा शंखनाद होणार असून आमदार किशोर जोरगेवार यांना टक्कर देण्यासाठी नवीन चेहरे पुढे येत आहे, कांग्रेस पक्षातून माजी पोलीस अधिकारी सुधाकर अंभोरे, प्रवीण पडवेकर, महेश मेंढे यांचे नाव आतापर्यंत पुढे आले असून आता यांच्यापेक्षा वजनदार उमेदवार अश्विनी खोब्रागडे यांनी सुद्धा चंद्रपूर विधानसभा राखीव मतदारसंघात आपली दावेदारी केली आहे.

अश्विनी खोब्रागडे या वर्ष 2009 पासून कांग्रेस पक्षात कार्यरत आहे, त्यांनी महिला कांग्रेस, अनुसूचित जाती कांग्रेस सेल चे मोठे पद भूषविले आहे.

उच्चशिक्षित असलेल्या अश्विनी खोब्रागडे यांचा विधानसभा क्षेत्रात सुद्धा चांगला जनसंपर्क आहे, कांग्रेस पक्षाच्या महिला आरक्षणानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात महिला उमेदवाराला संधी दिल्यास कांग्रेस पक्षाला त्याचा चांगला फायदा मिळू शकतो.

महत्त्वाचे : चंद्रपूर पोलीस विभागात खळबळ

अश्विनी खोब्रागडे यांनी कांग्रेस महानगर अध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडे इच्छुक उमेदवारीचा अर्ज भरला, यावेळी खोब्रागडे यांनी प्रतिक्रिया दिली की पक्षाने मला उमेदवारी देत निवडणूक लढण्याची संधी दिल्यास या विधानसभेत कांग्रेसचा उमेदवार नक्कीच जिंकणार, मला संधी न दिल्यास पक्ष जो पण उमेदवार देणार त्याच्या सोबत आम्ही कांग्रेस कार्यकर्ते काम करू. पक्षाचा उमेदवार जिंकून दाखवू.

10 ऑगस्ट पर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, सध्या काही निवडक इच्छुकांनी अर्ज केले मात्र त्यामधून अश्विनी खोब्रागडे यांची दावेदारी मजबूत असल्याची माहिती पुढे आली आहे.

वर्ष 2014 ते 19 पर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत कांग्रेसचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता, मात्र 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी मोठी आघाडी घेतल्याने विधानसभा निवडणुकीत याचा फायदा पक्षाला मिळू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!